life Insurance policy : कर वाचवण्यासाठी विमा पॉलिसी घेतली, पण नियम बदलले, काय कराल? वाचा सविस्तर…

5 लाख रुपयांपेक्षा जास्त परताव्यावर कर भरावा लागणार

225
insurance policy save tax, but rules change what to do? Read more...
insurance policy save tax, but rules change what to do? Read more...

कर वाचवण्यासाठी आयुर्विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या करदात्यांना या वर्षापासून कठीण काळ जाणार आहे. सरकारने 2023च्या अर्थसंकल्पात आयुर्विमा पॉलिसीबाबत मोठा बदल केला आहे. आता पॉलिसीच्या मुदतपूर्तीवर कर आकारला जाईल.

कोरोना महामारीनंतर आयुर्विमा पॉलिसी काढणे, ही प्रत्येक व्यक्तिच्या बाबतीत एक जीवनावश्यक बाब झाली आहे, मात्र बहुतांश लोकांचा विमा पॉलिसी काढण्यामागचा उद्देश वेगळा असू शकतो. काही जण कर भरावा लागू नये, यासाठी विमा पॉलिसीचा पर्याय निवडतात. असे असले तरीही 2023 च्या अर्थसंकल्पात सरकारने विमा पॉलिसीशी संबंधित नियम बदलले आहेत.

(हेही वाचा – Mumbai Police Seized Drugs : मुंबईत कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्स सह ११ जणांना अटक)

2023च्या अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केले होते की, आयुर्विमा पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्याच्या परताव्यावर आयकर भरावा लागेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) बुधवारी एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत म्हटले आहे की, जर जीवन विमा पॉलिसीवर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम भरला असेल, तर त्याचा परतावा उत्पन्नाचा भाग मानला जाईल आणि त्यावर कर भरावा लागेल.

केव्हापासून घेतलेल्या पॉलिसीवर लागू होईल कर ?
सीबीडीटीने आपल्या अधिसूचनेत प्राप्तीकराच्या 16व्या दुरुस्तीचा हवाला देऊन म्हटले आहे की, नियम 1UACA नुसार, नवीन नियम 1 एप्रिल 2023 नंतर खरेदी केलेल्या जीवन विमा पॉलिसींना लागू होईल.या अंतर्गत पॉलिसींचा एका वर्षातील एकूण प्रीमियम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जाईल.
एकापेक्षा जास्त पॉलिसी असल्यास…
विमा पॉलिसीअंतर्गत बदललेल्या नियमांमध्ये स्पष्ट असे म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॉलिसीज असतील, तर सर्व पॉलिसीजच्या प्रिमियमची एकूण मोजणी केली जाईल. यामध्ये एकूण प्रिमियम 5 लाखांपेक्षा जास्त नसेल, तर त्या पॉलिसींच्या मॅच्युरिटीच्या वेळी जो परतावा मिळेल, तो संपूर्णत: टॅक्स फ्री असेल. प्राप्तिकराच्या कलम 10(10D) अंतर्गत, विमा पॉलिसीच्या मुदतपूर्तीवर प्राप्त झालेल्या रकमेवर आयकर सूट उपलब्ध आहे. परंतु, प्रीमियमची रक्कम 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास, त्याच्या मॅच्युरिटीवर मिळणारे पैसे आयकराच्या कक्षेत येतील. म्हणजेच त्यावर कर भरावा लागेल.

विमाधारकाचा मुदतीपूर्तीपूर्वी मृत्यू झाल्यास…
2023-24 च्या अर्थसंकल्पात असे म्हटले आहे की, ULIP पॉलिसी वगळता,इतर सर्व पॉलिसीवर 5 लाख प्रीमियमचा नियम लागू असेल. याशिवाय, विमाधारकाचा पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाला,तर ती रक्कम 5 लाखांपेक्षा जास्त असली तरीही त्यावर इनकम टॅक्सचे कोणतेही नियम लागू होणार नाहीत.

हेही पाहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.