BMC : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदासाठी सनदी अधिकारी इच्छुक नाहीत ?

अतिरिक्त आयुक्तांची बदली होऊन २२ दिवस उलटूनही कोणाही अधिकाऱ्याची नियुक्ती नाही

253
BMC : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदासाठी सनदी अधिकारी इच्छुक नाहीत ?
BMC : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदासाठी सनदी अधिकारी इच्छुक नाहीत ?

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली होऊन तब्बल २२ दिवस उलटत आले, तरी त्यांच्या  रिक्त जागी अद्यापही कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. महापालिका अस्तित्वात नसल्याने मुंबई महापालिकेत प्रशासक नियुक्त केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त जागी त्वरित सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती होणे आवश्यक होते. परंतु २२ दिवस उलटत आले, तरी हर्डीकर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या या जागी शासनाच्या वतीने कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात एकमत न झाल्याने ही नियुक्ती केली जात नाही कि कोणी महापालिकेत यायला तयार नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचा – Mumbai Police Seized Drugs : मुंबईत कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्स सह ११ जणांना अटक)

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांची बदली झाल्यानंतर २ मे २०२३ रोजी या रिक्तपदी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २८ दिवसांची मसुरीचे प्रशिक्षण आणि त्यानंतर या पदाचा भार सांभाळणाऱ्या हर्डीकर यांची अवघ्या ८७ दिवसांमध्येच महामेट्रोच्या नागपूरच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. हर्डीकर यांची बदली २७ जुलै २०२३ रोजी झाली. मात्र तेव्हापासून आजतागायत या रिक्त जागी कोणाही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. हर्डीकर यांची बदली होऊन २२ दिवस उलटत आले, तरी या जागी कोणाही अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही.

यापूर्वी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे ३० एप्रिल २०२२ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर तब्बल २२ दिवसांनी म्हणजे २४ मे २०२२ रोजी आशिष शर्मा यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर प्रथमच हर्डीकर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी पुन्हा एकदा २२ दिवस उलटूनही कोणाही अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे ज्या महापालिकेत येण्यासाठी पूर्वी सनदी अधिकारी उत्सुक होते, त्याच महापालिकेत आता हे अधिकारी येण्यास तयार नाही की काय असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिकेतील आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त यांचे पद एक दिवसही रिक्त ठेवले जात नव्हते तिथे आता २२ दिवस उलटूनही अधिकाऱ्याची नियुक्ती होत नसल्याने सरकारमध्येही महापालिकेत कोणा अधिकाऱ्याची वर्णी लावण्यात एकमत होत नाही की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.