राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटकेत असलेल्या इसिस मॉड्युल प्रकरणातील संशयित दहशतवादी शमिल नाचन याच्या पडघा येथील घरी गुरुवारी (१७ ऑगस्ट) छापा टाकला. या छाप्यात एनआयएच्या हाती महत्वाची कागदपत्रे आणि काही पुरावे तसेच देशातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याच्या दहशतवादी संघटनेच्या कटाचा पर्दाफाश करणारे अनेक साहित्यही गुरुवारी टाकलेल्या छाप्यात सापडल्याचा दावा एनआयएने केला आहे.
या प्रकरणात शमिल नाचन याचे वडील आणि बॉम्ब स्फोटातील आरोपी साकीब नाचन चौकशी करण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. आरोपी शमिल साकिब नाचन हा साकिब नाचनचा मुलगा आहे. पडघ्यात राहणारा साकीब नाचन याला २००२-०३च्या मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोटा प्रकरणी दोषी ठरवून दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा भोगून २०१७ मध्ये साकीब नाचन हा तुरुंगातून बाहेर आला होता. साकीब हा सध्या भिवंडी तालुक्यातील पडघा येथे राहण्यास आहे. गेल्या आठवड्यात एनआयए साकीब नाचन याचा मुलगा शमिल नाचन आणि निकटवर्तीय अकिफ नाचन यांना पडघ्यातुन अटक करण्यात आली होती.
एनआयएच्या तपासात शमिल हा इसिस मॉड्युलचा एक भाग असून तो दहशतवादी कृत्यांसाठी इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनवणे, प्रशिक्षण आणि चाचणी करणे यामध्ये त्याचा सहभाग आढळून आला आहे. या अनुषंगाने एनआयए गुरुवारी शमिल याच्या पडघा येथील घरी छापा टाकून घराची झडती घेतली असता त्यांच्या हाती काही महत्वाचे पुरावे आणि दहशतवादी संघटनेच्या कटाचा पर्दाफाश करणारे अनेक साहित्य सापडले आहे. झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण आणि इतर काही संशयितांसह आणि इतर पाच आरोपींच्या सहकार्याने शमिल हा काम करत होता असे एनआयए कडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – Fats : पोटावरील थुलथुलीत लटकलेल्या चरबीला कसे कराल छूमंतर?)
इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी नावाचे दोन आरोपी ‘सुफा दहशतवादी टोळी’चे सदस्य होते व ते फरार होते. एनआयएने एप्रिल २०२२ मध्ये राजस्थानमध्ये कार मधून स्फोटके जप्त केल्याच्या प्रकरणात त्यांना ‘मोस्ट वॉन्टेड’ घोषित केले होते असे एनआयएने सांगितले. शमिलसह इसिस स्लीपर मॉड्यूलचे हे सदस्य कोंढवा, पुणे येथील घरातून कार्य करीत होते. त्या ठिकाणी त्यांनी बॉम्ब बनविण्यासाठी लागणारे आयईडी एकत्र केले होते आणि गेल्या वर्षी त्यांच्या कार्यशाळेत बॉम्ब प्रशिक्षण आणि बॉम्ब बनवण्याचे आयोजन केले होते आणि त्यात शमिलनेही भाग घेतला होता. त्यांने बनवलेल्या आयईडीची चाचणी घेण्यासाठी त्यांनी या ठिकाणी नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता, असेही एनआयएने सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community