एनआयएने पाठवले क्राईम ब्रॅंचच्या एका अधिका-याला समन्स… कोण आहे हा अधिकारी?

152

एनआयएने क्राईम ब्रांचमध्ये काम केलेल्या एका अधिकाऱ्याला समन्स पाठवलं असल्याची माहिती काही खत्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या अधिकाऱ्याची नुकतीच क्राईम ब्रांचमधून बदली करण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे एनआयएकडून आता या अधिका-याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

काय आहे या अधिका-याचे हिरेन यांच्या मृत्युशी कनेक्शन?

क्राईम ब्रॅंचच्या या अधिका-याची मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयास्पद भूमिका असल्याचा एनआयएला संशय आहे. ४ मार्च रोजी मनसुख याची हत्या करण्यात अली तेव्हा हा अधिकारी पोलिस आयुक्तालयातील सीआययूच्या कार्यालयात होता. सचिन वाझेने आपला फोन त्याच्याकडे दिला होता आणि कोणाचा फोन आलाच तर तो रिसिव्ह करून वाझे ऑफिसमध्ये असून कामात बिजी असल्याचं, सांगायला सांगितले होते. याआधीही या अधिकाऱ्याची एटीएसकडून चौकशी झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. एनआयएला संशय आहे की, वाझे ठाण्याला गेला होता तेव्हा हा फोन या अधिकाऱ्याकडे मुद्दाम देण्यात आला होता.

(हेही वाचाः मिठी नदीत मिळालेल्या नंबर प्लेटचे काय आहे औरंगाबाद कनेक्शन?)

पुराच्या मिठीतून ‘पुरावे’ सापडले

मनसुख हिरेन मृत्यूचा तपास एनआयएने आपल्या हाती घेतल्यानंतर एनआयएने जोरदार झाडाझडती करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार एनआयएने पुरासाठी प्रसिद्ध असलेल्या मिठी नदीतून पुरावे बेहेर काढले. या पुरांव्यात एकाच क्रमांकाच्या दोन नंबर प्लेट, तसेच एक सीपीयू, लॅपटॉप असे हाती लागले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.