व्यस्त जीवनशैली, रात्रीचे जागरण, आहाराच्या अनियमित वेळा, दैनंदिन जीवनातील ताणतणाव…इत्यादी कारणांमुळे झोपेवर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेचा आरोग्यावर परिणाम होतो. हल्ली बहुतांश लोकांना गाढ झोप हवी असते, पण रात्री अंथरुणावर पडल्यावर लवकर झोप लागत नाही. यामुळे शांत आणि गाढ झोपेसाठी विविध प्रकारची औषधेही घेतली जातात. या औषधांचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्याऐवजी दिवसभरातील काही सवयींपासून दूर राहिल्यास गाढ झोप लागायला मदत होऊ शकते.
रात्री झोपताना मोबाईल वापरणे
काही जणांना अंथरुणात पडल्यावर मोबाईल वापरण्याची सवय असते. व्हिडियो, मेसेज, मोबाईल चॅटिंग रात्री झोपायच्या वेळ केल्यास झोपेची वेळ आपसूक टाळली जाते. मोबाईलमधील लाईटचा शांत झोप लागण्यावर परिणाम होतो. रात्री बराच वेळ मोबाईल बघितल्याने झोप पूर्ण होत नाही. सकाळी उठल्यावर उत्साह जाणवत नाही. याचा दिवसभरातील कामावर परिणाम होतो. यामुळे रात्री झोपताना मोबाईल पाहाणे टाळावे.
( हेही वाचा – Senate Election : मुंबई विद्यापीठानं रातोरात सिनेटची निवडणूक केली स्थगित)
झोपण्यापूर्वी चहा पिणे
काही जणांना रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफी पिण्याची सवय असते. या पेयांमध्ये कॅफिन असते. त्यामुळे झोप टाळली जाते. यासाठी झोपण्याआधी ही कॅफिनयुक्त पेये पिऊ नयेत.
दिवसा झोपणे
रात्री झोप न झाल्यामुळे दिवसा किंवा दुपारी झोप येते. त्यामुळे रात्रीची अपुरी झोप दिवसा भरून काढण्याची काही जणांना सवय असते. यामुळे रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो. हे चक्र सतत सुरू राहिले, त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीची झोप फार महत्त्वाची आहे. रात्री गाढ झोप लागली की, सकाळी उठल्यावर ताजेतवाने आणि उत्साही वाटते. दिवसभरातील कामेही वेगाने पूर्ण होतात.
मेडिटेशन न करणे
बहुतांश जणांना मेडिटेशन अर्थात ध्यानधारणेचे महत्त्व माहित नसते, तर ज्यांना माहित असते त्यांच्या वेळ नसतो. ध्यानधारणा-मेडिटेशन केल्यामुळे जीवनातील बऱ्याचशा समस्या दूर होऊ शकतात. यामुळे दिवसभरातील किमान 15 मिनिटे तरी ध्यानधारणेकरिता राखून ठेवा. त्यावेळी सर्व कामे बाजूला सारून ध्यानधारणा, मेडिटेशन करण्यासाठी वेळ द्या.यामुळे झोपेच्या तक्रारी आणि ताणतणाव दूर व्हायला मदत होऊ शकते.
रात्री जागरण करणे
रात्री जागरण केल्यामुळे झोपेची वेळ पाळली जात नाही. यामुळे सकाळी उठायला उशीर होतो. हल्ली कामाच्या बदलत्या वेळांमुळेही काही जणांना रात्री झोपायला उशीर होतो. यासाठी अनावश्यक जागरण टाळणे. रात्री झोपण्याची, आहारविहाराची वेळ ठरवणे, त्याचं पालन करणे आणि सकाळी लवकर उठणे हा शरीर निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.
हेही पहा –