Non AC Vande Bharat : आता प्रवास होईल स्वस्तात मस्त!, पहिली नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच होणार सुरु

प्रवाशांना अगदी स्वस्तात आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे

271
Non AC Vande Bharat : आता प्रवास होईल स्वस्तात मस्त!, पहिली नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच होणार सुरु
Non AC Vande Bharat : आता प्रवास होईल स्वस्तात मस्त!, पहिली नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच होणार सुरु

पहिली नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसेच या वर्षात दोन नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. आयसीएफ (ICF) चेन्नईकडून वंदे भारत एक्सप्रेस नव्या स्वरुपात आणण्याची योजना आखण्यात येत आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अगदी स्वस्तात आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.

रचनेमध्ये बदल, मात्र सुविधा त्याच –

सध्या धावत असलेल्या एसी वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा नॉन एसी वंदे भारतची बाह्य रचना ही थोडी वेगळी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू, नव्या नॉन एसी वंदे भारतचा आरामदायी प्रवास आणि सुविधेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. ही नवी नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असून, या गाड्यांमध्ये फायर अलार्म सिस्टीम, इमर्जन्सी अलार्म या सुविधाही असणार आहेत. या एक्सप्रेसमधील टॉयलेट देखील वंदे भारत एक्सप्रेस सारखेच असणार आहेत. तसेच एलएचबी कोचही असणार आहेत.

(हेही वाचा – Monsoon Update : महाराष्ट्रासह मध्यभरातात पावसाचा जोर वाढणार)

एसी वंदे भारतपेक्षा असणार कमी वेग –

एसी वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा वेग मात्र कमी असणार आहे. सध्या धावत असलेल्या एसी वंदे भारत एक्सप्रेसचा वेग ताशी १६० किमी इतका असून, नव्या नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा ताशी वेग हा १३० किमी असणार आहे. या निर्णयावर रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, रेल्वेच्या खिडक्या उघड्या असताना जास्त वेगाने एक्सप्रेस चालवणे हे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे या एक्सप्रेसचा वेग एसी वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा कमी ठेवण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.