नागपुरमध्ये सीएनजीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर कमी झाल्यामुळे नागपुरात सीएनजीचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये नागपुरात सीएनजी ११६ रुपये प्रति किलो होता. तोच दर आता ८९ रुपये ९० पैशांवर आला आहे. एका वर्षांत नागपुरात सीएनजी २६ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
नागपूरात ऑगस्ट १५ पर्यंत सीएनजी दर ९९ रुपये ९० पैसे प्रति किलो एवढा होता. १५ ऑगस्टच्या रात्रीपासून सीएनजीचे दर प्रति किलोमागे दहा रुपयांनी कमी झाल्यामुळे सध्या ८९ रुपये ९० पैसे एवढा सीएनजी प्रति किलोचा दर झाला आहे. नागपुरात मोठ्या संख्येने रिक्षा सीएनजीवर चालतात. त्यामुळे रिक्षा चालकांना या दर घसरणीमुळे मोठा फायदा होत आहे. सीएनजीच्या दरात घसरण होत असल्यामुळे दिलासा मिळत असल्याची प्रतिक्रिया कारचालकांनी दिली. दरम्यान, सीएनजीच्या दरात मोठी घसरण होत असली तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये केव्हा घसरण होईल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
(हेही वाचा – Special Blog on Central Railway : मध्य रेल्वेवर शनिवार-रविवार विशेष पॉवर ब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?)
सीएनजी (CNG) म्हणजे काय?
सीएनजीचे पूर्ण नाव “कंप्रेस्ड नॅचरल गॅस” आहे. हा देखील नैसर्गिक वायू आहे, परंतु तो उच्च दाबाने म्हणजेच, २०० बार पर्यंत कम्प्रेस्ड केला जातो. वाहनांमध्ये इंधनाऐवजी सीएनजीचा वापर केला जातो. सिलेंडरमध्ये अधिकाधिक वायू साठवून त्याचा दीर्घ कालावधीसाठी वापर करणे हा गॅस कम्प्रेस करण्याचा मुख्य उद्देश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community