Flood Watch App : केंद्र सरकारच्या ‘फ्लड वॉच” या अॅपच्या माध्यमातून आता मिळणार पूरस्थितीचे अपडेट

इंटरअॅक्टिव्ह मॅप्सचा वापर करुन लोकांना पुराविषयीचा अंदाज आणि सद्यस्थितीची मिळणार माहिती

146
Flood Watch App : केंद्र सरकारच्या 'फ्लड वॉच" या अॅपच्या माध्यमातून आता मिळणार पूरस्थितीचे अपडेट

पूर परिस्थितीशी संबंधित माहिती (Flood Watch App) आणि सात दिवसांपर्यंतची अद्ययावत माहिती जनतेला देण्यासाठी, केंद्रीय जल आयोगाचे (CWC) अध्यक्ष कुशविंदर वोहरा यांनी आज (शुक्रवार १८ ऑगस्ट) “फ्लडवॉच” (Flood Watch App) हे मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केले आहे.

आयोगाच्या अंतर्गत, विकसित करण्यात आलेल्या वापरकर्त्यासाठी अनुकूल अशा अॅपमध्ये (Flood Watch App) लेखी आणि ऑडिओ माहिती असेल आणि ही सर्व माहिती दोन हिंदी आणि इंग्लिश अशा दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अॅपमध्ये रिअल-टाइम फ्लड मॉनिटरिंग व्यवस्था असून, त्यामुळे देशभरातील पूरस्थितीवर सतत देखरेख ठेवता येईल. तसेच, या अॅपचा उपयोग, विविध स्त्रोतांमधून रियल टाईम जल डेटा देखील बघता येईल. तसेच, वापरकर्त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशातील पूर परिस्थितीची आणि त्याविषयीच्या मार्गदर्शनाची माहिती देखील मिळेल.

(हेही वाचा – Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ)

इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये परस्परसंवादी नकाशा वापरून अंदाज व्यक्त केला जाणार आहे. या संवादात्मक नकाशावरून वापरकर्ते (Flood Watch App) थेट आपले स्थानक निवडून आयोग पूर अंदाज (२४ तासांपर्यंत) किंवा सात दिवसांची पूराची विषयक स्थिती तपासू शकतील.

वापरकर्त्याने ड्रॉपडाऊनमधून आपले स्थानक निवडल्यानंतर, नकाशावर ते स्थान झूम केले जाईल. अॅपवर, (Flood Watch App) राज्यवार/खोऱ्यानिहाय पूराचा २४ तासांपर्यंतचा अंदाज किंवा पूर स्थिती सांगितली जाईल. ड्रॉपडाउन मेनूमधून विशिष्ट स्थानके निवडून, राज्यानुसार किंवा नदी खोऱ्यानुसार माहिती मिळवली जाऊ शकेल.

वापरकर्ता-अनुकूल (Flood Watch App) अॅप अॅन्ड्रॉइड मोबाईलवर उपलब्ध आहे, हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येईल. हे अॅप लवकरच अॅपल iOS वर देखील उपलब्ध होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.