विस्तारा एअरलाईन्सच्या दिल्ली-पुणे विमानात बॉम्बची धमकी मिळाली आहे. जीएमआर कॉल सेंटरला शुक्रवारी (१८ ऑगस्ट) धमकीचा फोन आल्यानंतर सर्व प्रवाशांना सामानासह सुरक्षित खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. परंतु, विमानात कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दिल्ली पोलिस आणि विमानतळाची सुरक्षा सांभाळणाऱ्या सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिलाय.
(हेही वाचा – Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ)
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यूके ९७१ क्रमांकाचे विस्तारा विमान शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता दिल्लीहून पुण्यासाठी रवाना होणार होते. त्यात प्रवासीही चढले होते. तेव्हाच जीएमआर ग्रुप संचालित कॉल सेंटरला दिल्ली-पुणे विस्तारा फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विमानाची तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे बॉम्बच्या संदर्भातील आलेला फोन अफवा असल्याचे सिद्ध झाले. यावेळी विमानात १०० हून अधिक प्रवासी होते. या सर्व घटनेचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. दरम्यान, पोलिस बॉम्बची अफवा पसरवणाऱ्याचा शोध घेत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community