गुजरातमधील अहमदाबाद येथे एका सुफी संतांचे 500 वर्षांनंतर हिंदु नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येथे हिंदु-मुस्लिम बांधवांमध्ये धार्मिक वादविवाद निर्माण झाला.
पीर इमामशाह बाबा असे या सुफी संतांचे नाव आहे. त्यांचे निधन होऊन 500 वर्षे झाली. अहमदाबाद येथील पिराना परिसरात त्यांची मशीद होती. पीर इमामशाह बाबांचे काही मुस्लिमांप्रमाणेच हिंदु अनुयायीही आहेत.या अनुयायींनी पीर इमामशाह बाबा या सुफी संतांचे नाव बदलून सद्गुरु हंसतेजजी महाराज असे ठेवण्याचा निर्णय घेतला.यामुळे भडकलेल्या मुस्लिम समुदायाकडून इमामशाह बाबा रोजा संस्थान ट्रस्टकडून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेचे अनेक सभासद अनिश्चित काळासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.याशिवाय येथील अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी आरोपही केले आहेत.यापूर्वी मस्जिद परिसरात मंदिर बांधण्यासाठी हिंदुंना विरोध करण्यात आला होता.
(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj Insult : कर्नाटकातील काॅंग्रेस सरकारचा धर्मद्रोह, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला)
संतांच्या वंशाजांनीही केला विरोध…
मशीद परिसरात आमरण उपोषणाला बसलेल्या 25 लोकांनी सुरक्षेची मागणी केली आहे. पीर संतांच्या वंशजांनीही हिंदू नामकरण करण्याच्या या निर्णयाला विरोध केला असून पीर इमामशाह बाबा यांचे वंशज स्थानिक सैय्यद समुदायाशी जोडले गेले आहेत. या घटनेबाबत गुजरातच्या राज्यपालांकडे अनेक अधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community