chandrayan-3 : इस्रो ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडिओ

व्हिडिओमध्ये चांद्रयान चंद्रावरून जात असून त्यात बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे काढत आहेत आणि व्हिडिओ बनवत आहेत.

210
Chandrayan -3: रात्री दोन वाजता चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्राच्या जवळ
Chandrayan -3: रात्री दोन वाजता चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्राच्या जवळ

चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या आपल्या चांद्रयानाने चंद्राचा एक अप्रतिम व्हिडिओ पाठवला आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) Isro ने १५ ऑगस्ट रोजी चांद्रयानसाठी  (chandrayan-3) घेतलेला हा व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओमध्ये चंद्रावरील खड्डे दिसत आहेत. इस्रोने सांगितले की, लँडरच्या कॅमेऱ्याने हा व्हिडिओ पाठवला आहे. इस्रोने ट्विट केले आहे की लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC) ने हा व्हिडिओ १५ ऑगस्ट २०२३ रोजी घेतला आहे.

(हेही वाचा : Central Government : वाढत्या महागाईवर केंद्र सरकार मिळवणार नियंत्रण)

 

 

 

व्हिडिओमध्ये चांद्रयान चंद्रावरून जात असून त्यात बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे काढत आहेत आणि व्हिडिओ बनवत आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी चंद्रयानाने चंद्राच्या कक्षेत जात असतानाही चंद्राचे छायाचित्र पाठवले होते. या चित्रातही चंद्राचा पृष्ठभाग स्पष्ट दिसत होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.