Assembly Elections :मोदींच्या चेह—यावर विधानसभेची निवडणूक लढणार

156
Assembly Elections :मोदींच्या चेह—यावर विधानसभेची निवडणूक लढणार
Assembly Elections :मोदींच्या चेह—यावर विधानसभेची निवडणूक लढणार

आगामी काळातील विधानसभांच्या निवडणुका Assembly Elections पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच लढविण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून घेण्यात आला आहे. अंतर्गत गटबाजीला वेसण घालणे आणि मोदी यांच्या लोकप्रियतेचा पुरेपूर फायदा उचलणे हा या निर्णयामागचा हेतू असल्याचे बोलले जात आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोरम या पाच राज्यांमध्ये तीन चार महिन्यात आगामी विधानसभेची निवडणूक होणार आहे. यासर्व निवडणुकांमध्ये राज्यांतील नेते अग्रभागी असतील. फक्त चेहरा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राहणार आहे.मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील वातावरण भाजपसाठी अनुकूल आहे. मात्र, राजस्थानमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे विजय हातातून निसटू शकते, अशी भाजपच्या हायकमांडला शंका आहे.काँग्रेसच्या तावडीतून सोडवित राजस्थानला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर मोदी यांचा चेहरा पुढे करून निवडणूक लढविली गेली पाहिजे, असा निष्कर्ष रणनितीकारांनी काढला आहे.तिन्ही राज्यांतील अंतर्गत गटबाजीला आवर घालण्यासाठी हा रामबाण उपाय होय असे रणनितीकारांना वाटत आहे. पाचही राज्यांत मुख्यमंत्री चेहरा जाहीर न करणे आणि राजस्थानमधील निवडणूक व्यवस्थापन समिती आणि संकल्प पत्र समितीमध्ये वसुंधरा राजे यांना स्थान न देणे हा याच डावपेचाचा भाग असल्याची चर्चा भाजपच्या मुख्यालयात रंगली आहे. मात्र, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना निवडणूक प्रचार समितीत स्थान दिले जाणार असल्याची चर्चा आहे. त्या राजस्थानच्या मोठ्या नेत्या आहेत आणि त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पुरेपूर वापर केला जाईल, अशी चर्चा आहे. याशिवाय, राज्यांतील अन्य नेत्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपविली जाणार आहे. यामुळे एकजुटीचे वातावरण तयार होईल आणि त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसून येईल, असे रणनितीकारांना वाटत आहे.

(हेही वाचा :Ashram : हिंदू संत, आश्रमव्यवस्थेची विटंबना करणाऱ्या ‘आश्रम’ वेबसिरीजचे निर्माता प्रकाश झा, कलाकार बॉबी देओल अडचणीत)

भाजपने मध्यप्रदेशातही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारची ‘लाडली बहन’ योजना खूप लोकप्रिय ठरत आहे. यानंतरही भाजपने निवडणूक प्रचार समितीची धुरा मुख्यमंत्री चौहान यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हाती सोपविली आहे. मिझोराम, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाचही राज्यांच्या मागच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचे तोंड बघावे लागले होते. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या गेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी लोकसभेत मात्र भाजपला खूप चांगले यश मिळाले होते. तेलंगणाच्या निवडणुकीत ११७ जागा लढविल्या होत्या आणि भाजपला केवळ एक जागा जिंकता आली होती. परंतु, आताची परिस्थिती खूप चांगली आहे. फक्त अंतर्गत गटबाजीमुळे हाती आलेली सत्ता जावू नये यासाठी भाजपने ही रणनिती आखली आहे.भाजपला आता कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नाही आहे. कदाचित म्हणूनच गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी राजस्थानची जबाबदारी घेतली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.