तुम्ही जे काही खाता किंवा पीता, त्यातील काही कण तुमच्या दातांना आणि हिरड्यांना चिकटून राहतात. बरेच लोक काहीही खाल्ल्यानंतर दात स्वच्छ धूत नाहीत किंवा दिवसातून दोनदा ब्रश करत नाहीत. यामुळेच हे कण हळूहळू प्लाकचे रूप धारण करतात. त्यामुळे अनेकांचे दात पिवळे दिसतात. जेव्हा हा प्लाक जास्त प्रमाणात जमा होतो तेव्हा तो टार्टरचे रूप धारण करतो. दातांवर टार्टर जमा होणे ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे दात फक्त पिवळेच पडत नाहीत तर हळूहळू दातांच्या मुळांमध्ये शिरून ते दाताला आतून पोकळ बनवतात.
यामुळे तुम्हाला श्वासाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दात पिवळे पडणे, पायोरिया रोग, दातांची मुळं कमकुवत होणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात आणि हिरड्या दुखणे अशा समस्या सुरू होतात. नॉएडा येथील E-260 सेक्टर 27 येथे असलेल्या ‘कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक’चे डायरेक्टर कपिल यांच्या मते, तोंडाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी टार्टर साफ करणे आवश्यक आहे. साहजिकच यासाठी डेंटिस्टकडे गेल्यास तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतील. मात्र, काही घरगुती उपायांनीही तुम्ही दातांवर साचलेला हा काळा पिवळा घाणीचा थर दूर करू शकता.
बेकिंग सोडा
- बेकिंग सोडा एक नैसर्गिक टूथपेस्ट म्हणून वापरला जाऊ शकतो
- तुमच्या टूथब्रशला थोडासा बेकिंग सोडा लावा आणि हळूवारपणे दात घासून घ्या.
- चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा बेकिंग सोडा वापरा.
अॅप्पल सायडर व्हिनेगर
अॅप्पल सायडर व्हिनेगर हे नैसर्गिक अॅसिड मानले जाते, जे की एक नैसर्गिक टूथपेस्ट म्हणून उपयोगी पडते. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या दातांवर जमा झालेला पिवळा थर काढून टाकू शकता. यासाठी तुम्हाला एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर एक कप पाण्यात मिसळावे लागेल. आणि हे पाणी ते तोंडाच्या चारी बाजूंनी घुसळा आणि 1-2 मिनिटे चूळ भरा, नंतर तोंड पाण्याने स्वच्छ धुवा. पुढे, कॉलगेट आणि ब्रशने दात व तोंड स्वच्छ करा. लक्षात ठेवा की अॅप्पल सायडर व्हिनेगरचा जास्त वापर करू नका कारण ते वारंवार वापरल्यास ते तुमच्या दातांच्या इनॅमललाही नुकसान पोहोचवू शकते. शिवाय त्याचा वास तोंडात राहू शकतो म्हणून पाण्याने चांगल्या पाच ते दहा वेळा चूळ भरा.
लिंबाचा रस
लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे दात पांढरे होण्यास मदत होते. थोड्या प्रमाणात लिंबाचा रस घ्या आणि दातांच्या पृष्ठभागावर लावा आणि 2-3 मिनिटे तसेच ठेवा. नंतर चांगल्या गुळण्या करा व पेस्ट आणि ब्रशने दात स्वच्छ करा.
हळद आणि मीठ
मोहरीचे तेल, मीठ आणि हळद मिक्स करून हे मिश्रण वापरल्याने दात पांढरे आणि चमकदार होतील. एका भांड्यात एक चमचा मोहरीचे तेल, चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा हळद घाला. चिकट मऊसूत पेस्ट होईपर्यंत ते चांगले मिसळा.
थोड्या वेळाने, या पेस्टने काही मिनिटे दात स्वच्छ करा आणि नंतर पाण्याने गुळण्या करून दात स्वच्छ धुवा.