lifestyle : सकाळी रिकाम्यापोटी प्या सैंधव मिठाचे पाणी, ‘या’ आजारांपासून राहाल दूर

रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठीही गुणकारी

200
lifestyle : सकाळी रिकाम्यापोटी प्या सैंधव मिठाचे पाणी, 'या' आजारांपासून राहाल दूर
lifestyle : सकाळी रिकाम्यापोटी प्या सैंधव मिठाचे पाणी, 'या' आजारांपासून राहाल दूर

आहारात अतिप्रमाणात मिठाचा वापर केल्यास ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. रक्तदाब वाढणे, स्ट्रोक, ह्रदयविकार या आजारांचा धोका आहारात मिठाचा अति वापर केल्याने होऊ शकतो. याकरिता डॉक्टरही मिठाचा वापर आहारात मर्यादित प्रमाणात करण्याचा सल्ला देतात, मात्र संपूर्णत: नैसर्गिक असलेले सैंधव मीठ आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते शिवाय हे मीठ विविध पदार्थांमध्ये घालून खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्याबरोबरच विविध प्रकारचे आजार दूर होण्यासाठी मदत होऊ शकते.

सैंधव मिठाला रॉक सॉल्ट किंवा हिमालयन सॉल्ट असेही म्हणतात. सकाळी रिकाम्या पोटी सैंधव मिठाचे पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यास काही गंभीर स्वरुपाचे आजार बरे होण्यास मदत होऊ शकते.

(हेही वाचा – Jasprit Bumrah : बुमराहचा यशस्वी कमबॅक; आयर्लंडचा डकवर्थ लुईस नियमांनुसार २ धावांनी पराभव)

पचनविकार

पोटाच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी सैंधव मिठाचं पाणी प्यावं. यामुळे पोटातील आम्ल वाढते. अन्न पचन होऊन पोटातील गॅस, पोटदुखी, अपचन यासारख्या समस्यांवर मात करता येते.

विषारी घटक शरीराबाहेर काढणे

शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर काढण्यासाठी सैंधव मीठ गुणकारी मानले जाते. यामुळे यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य उत्तमरित्या सुरू राहते. यामुळे अनेक प्रकारचे आजार दूर होतात.

चयापचय वाढवण्यासाठी उपयुक्त

सकाळी रिकाम्यापोटी सैंधव मिठाचे पाणी प्यायल्याने चयापचय वाढते. यामुळे मधुमेहासारख्या समस्या दूर होतात. शरीरातील अतिरिक्त फॅट झपाट्याने कमी व्हायला मदत होते.

इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढण्यासाठी 

सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यासाऱखी 84 खनिजे सैंधव मिठात असतात. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात इलेक्ट्रोलाईचटी कमतरतेमुळे सतत थकवा, अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवतात.

तणावमुक्त राहण्यास मदत

सैंधव मिठाचे पाणी प्यायल्याने मानसिक समस्यांपासून दूर राहायला मदत होते. हे पाणी प्यायल्यास तणाव दूर होतो.

हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर

फुफ्फुसे आणि हाडे मजबूत राहण्यासाठी, पीच पातळी संतुलित राहण्यासाठी तसेच शरीर निरोगी आणि त्वचेचे सौंदर्य वाढण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी सैंधव मिठाचे पाणी प्यावे.

 

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.