Sharad Pawar : I.N.D.I.A संदर्भातील बैठकीला पवारांची दांडी; ‘ज्युनिअर टीम’ पाठवून दिला सूचक इशारा

134
Sharad Pawar : I.N.D.I.A संदर्भातील बैठकीला पवारांची दांडी; 'ज्युनिअर टीम' पाठवून दिला सूचक इशारा

विरोधकांच्या ‘इंडिया’ (Sharad Pawar) आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. त्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीला ठाकरे गट आणि काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून एकही बडा नेता आला नाही. त्याऐवजी ‘ज्युनिअर टीम’ पाठवून शरद पवारांनी (Sharad Pawar) सूचक इशारा दिला आहे.

‘इंडिया’ (Sharad Pawar) आघाडीच्या बैठकीच्या तयारीसाठी मातोश्री येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरेंद्र वर्मा आणि आदिती नलावडे यांना पाठविण्यात आले.

(हेही वाचा – Nitin Gadkari : कॅगच्या अहवालावरून नितीन गडकरी नाराज; अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चितीचे निर्देश)

वास्तविक स्वतः (Sharad Pawar) शरद पवार, ते नसल्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा त्यांच्या समक्षक नेता या बैठकीला उपस्थित राहील, अशी काँग्रेस आणि ठाकरे गटाला अपेक्षा होती. मात्र, पवारांनी ‘ज्युनिअर टीम’ पाठवून त्यांना सूचक इशारा दिला आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसने अलीकडेच पवारांविना लढण्याची चाचपणी सुरू केल्याने ते नाराज आहेत. त्यामुळेच पवारांनी (Sharad Pawar) ही खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शरद पवारांच्या भूमिकेबाबत मविआत संभ्रम

राष्ट्रवादीत (Sharad Pawar) उभी फूट पडल्यानंतरही शरद पवार गटाने अजित पवार आणि इतर आमदारांविरोधात याचिका दाखल केलेली नाही. विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात आलेला नाही. किंबहुना अजित पवार आणि गटाविरोधात ठोस भूमिका घेतलेली नाही. पावसाळी अधिवेशनात लोकसभेत किंवा राज्यसभेत महत्त्वाच्या विधेयकांवेळी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर बडगा उगारला नाही. याउलट अजित पवार किंवा त्या गटाच्या नेत्यांसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संवादमालिका सुरू आहेत. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भूमिकेबाबत महाविकास आघाडीत संभ्रम आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.