गणेशोत्सव सर्वांना आनंद देणारा उत्सव आहे. त्यामुळे आवाजाच्या भिंती उभ्या न करता पारंपरिक आणि भारतीय संस्कृतीला पोषक असणारी वाद्ये मिरवणुकीत वापरावीत. वांद्यांचा वापर मिरवणुकीसाठी केला पाहिजे, असे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी केले. श्रीमंत दगडुशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात गणेशोत्सव स्पर्धा पारितोषिक समारंभात त्या बोलत होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या की, गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी आलेल्या महिला आणि मुलींना सुरक्षित वाटेल, अशी व्यवस्था मंडळांनी करायला हवी. अनेक मंडळे सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवत असतात. या उपक्रमातून समाजाला दिशा मिळत असते. कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून सहकार्याची भूमिका ठेवायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली तसेच कार्यकर्ते निर्माण करण्याचे व्यासपीठ म्हणजे गणेशोत्सव मंडळे. या मंडळांमधूनच उद्याच्या जगाचे नेतृत्व आणि कर्तृत्व आकाराला येते.
(हेही वाचा – Ratan Tata : महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान)
आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते शहरातील विजेत्या मंडळांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. तसेच इतर 6 मंडळांना ‘जय गणेश’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी थेरगाव येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाने गणेशोत्सव स्पर्धेत शहरात प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, सुनील रासने, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community