Love Jihad In Nagar : शिकवणीच्या नावाखाली मुसलमान शिक्षिका देते लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे धडे

शिक्षिकेसह ८ जणांवर गुन्हा दाखल, तर ४ आरोपींना अटक

169
Love Jihad In Nagar : शिकवणीच्या नावाखाली मुसलमान शिक्षिका देते लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे धडे
Love Jihad In Nagar : शिकवणीच्या नावाखाली मुसलमान शिक्षिका देते लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे धडे

आम्ही शिकवणीला जात असलेल्या ठिकाणच्या शेख या शिक्षिकेने आमची त्यांच्या समाजातील मुलांशी ओळख करून देऊन सेल्फी काढण्यास सांगितले. तुम्ही आमच्या समाजाच्या रितीप्रमाणे वागत जा, टिकली लावू नका. बुरखा घालत जा, असे ही शिक्षिका वारंवार सांगते. आम्हाला आम्हाला धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. बनावट अकाउंट बनवून फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली आहे, अशी तक्रार २ अल्पवयीन मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात केली आहे. यातून शिकवणी घेण्याच्या माध्यमातून मुसलमानांकडून हिंदू मुलींना धर्मांतर करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे समाेर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात लव्ह जिहाद आणि धर्मांतर करण्यासाठी रॅकेट काम करत आहे, हेच यातून उधड झाले आहे. या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – ED Raids RL Jewellers : जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचा छापा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईश्वरलाल जैन अडचणीत)

मुसलमान शिक्षिकेच्या माध्यमातून ओळख झालेल्या मुलांकडून सतत आम्हाला ‘तू मला आवडतेस’, ‘माझ्याशी लग्न कर’ असे मेसेज येत होते. मुलींनी नकार दिल्यानंतर मेसेज व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. अल्पवयीन हिंदू मुलीने झालेला सर्व प्रकार कथन केला आहे.

२ दिवसांपूर्वी हिंदू अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे आणि विनयभंग केल्याची तक्रारीनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात
परस्परविरोधी ३ तक्रारी दाखल झाल्यानंतर आता आणखी दोन मुलींनी गुन्हा दाखल केला असून शिक्षिकेसह ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे, तर ४ आरोपींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी या घटनेबाबत औचित्याचा मुद्दासुद्धा उपस्थित केला होता. पहिल्या प्रकरणातील आरोपीचे नाव निष्पन्न झाल्यानंतर आता याच आरोपींनी अनेक मुलींची फसवणूक केली असल्याच समोर आले आहे. माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डीले यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.आतापर्यंत ३ मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने राज्यात धर्मांतर करण्याचे रॅकेट सुरू आहे का ?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

१९ ऑगस्टच्या रात्री हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली, तर माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनीसुद्धा पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. दोन्ही अल्पवयीन मुलींच्या तक्रारीनंतर ८ जणांविरुद्ध कलम ३५४, ३५४ (ड), १०९, ३४ बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षिकेसह 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हा सगळा प्रकार अनेक दिवसापासून सुरू असून केवळ लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिले. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात लव्ह जिहादच्या अनेक घटना समोर येत आहेत. याविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित होऊनही हे प्रकार सुरूच असल्याने लव्ह जिहादी आणि त्यांना साथ देणारे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटना करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.