अभद्र भाषेत लिखाण करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांची खासदारकी रद्द करा’, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. शुक्रवारी, १७ ऑगस्टला विधिमंडळाच्या हक्कभंग समितीने राऊतांविरोधात राज्यसभेकडे कठोर कारवाईसंदर्भात निवेदन पाठवले आहे. त्यामुळे लोढा यांचे उपरोक्त विधान राऊतांवर कारवाईसंदर्भात संकेत देणारे आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सामना वृत्तपत्रातून लिखाण करण्यात आल्यामुळे, त्याच्या निषेधार्थ भाजपाकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी आपला निषेध व्यक्त करताना संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली आणि दोघांनी माफी मागावी, अशी मागणी केली. संतप्त आंदोलकांनी सामना वृत्तपत्राच्या आवृत्तीचे दहन देखील केले. संजय राऊत, जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील, असे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.
(हेही वाचा : Chandrapur : चंद्रपुरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार)
पोलिसांत तक्रार दाखल करणार
“आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल संजय राऊत यांनी जे काही लिहीले आहे, ते अतिशय अयोग्य आहे. मी सरकारकडे मागणी करतो कि संजय राऊत यांची खासदारकी रद्द करावी. त्यांच्या लिखाणावर फक्त भाजपाचा नाही, तर महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा आक्षेप आहे आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलिसात तक्रार करणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे, फक्त प्रसिद्धीसाठी सुरु असलेल्या संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्याची उद्धव ठाकरे यांनी दखल घ्यावी. जोपर्यंत संजय राऊत माफी मागत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहील,” असे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community