Mukesh Ambani : शेअर बाजारातील भरभराटीमुळे उद्योगपतींची संपत्तीही वाढली

ब्लूमबर्गच्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानींनी अकरावे स्थान राखले

142
Israel-Iran War : युद्धाजन्य वातावरणात अंबानींनी गमावले ३६,००० कोटी, तर अदानींचे २४,६०० कोटींचे नुकसान

ऋजुता लुकतुके

रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात जास्त बाजारमूल्य असलेली कंपनी आहे. तिचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान आता मागचे सहा महिने टिकवला आहे. ब्लूमबर्गच्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानींनी आपले अकरावे स्थानही राखले आहे. हिंडेनबर्गच्या प्रतिकूल अहवालानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत अचानक मोठी घट झाली. आणि जानेवारी २०२३ मध्ये मुकेश अंबानी यांनी देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान पुन्हा मिळवला. तेव्हापासून त्यांनी तो टिकवला आहे. रिलायन्स कंपनीचं ब्रँड मूल्य, बाजार मूल्य तसेच त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतही या काळात वाढ झाली आहे.

(हेही वाचा – Retail Food Inflation : देशात किरकोळ महागाई दर इतका का वाढला ?

६६ वर्षीय मुकेश यांची एकूण मालमत्ता ९६.४ अब्ज अमेरिकन डॉलर आहे. मुकेश यांना २०२३च्या सुरुवातीपासून भारतीय शेअर बाजारात झालेल्या परकीय गुंतवणुकीने मोठा हात दिला आहे. कारण, जानेवारी २०२३ पासून भारतीय शेअर बाजार ७.३ टक्क्यांनी वधारले आहेत. रिलायन्स कंपनीच्या शेअरमध्येही या कालावधीत ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

अलीकडेच कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस अशा दोन कंपन्यांमध्ये विभागण्याचा (stock Split) निर्णय घेतला आहे. या घडामोडीमुळेही कंपनीच्या समभागांमध्ये मोठी गुंतवणूक अलीकडे होताना दिसतेय. शेअर बाजारातील भरभराटीचा फायदा देशातील सगळ्याच उद्योगपतींना झाला असून त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेत भर पडली आहे. गौतम अदाणी आणि राधाकृष्ण दमाणी या दोन भारतीय उद्योजकांच्या संपत्तीत मात्र घट झाली आहे.

देशातील पहिले १० श्रीमंत व्यक्ती
  • मुकेश अंबानी (९७.२ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • गौतम अदानी (६२.३ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • शापूर मिस्त्री (३१.१ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • शिव नादर (२६.९ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • अझिम प्रेमजी (२३.९ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • सायरस पुनावाला (१८.७ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • लक्ष्मी मित्तल (१८.६ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • दिलीप संघवी (१८.४ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • सावित्री जिंदाल (१७.५ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • राधाकृष्ण दमानी (१६.७ अब्ज अमेरिकन डॉलर)
जगातील पहिले १० श्रीमंत व्यक्ती
  • एलॉन मस्क (२१७ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • बर्नार्ड आर्नोल्ट (१८७ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • जेफ बेझोस (१६२ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • लॅरी एलिसन (१३० अब्ज अमेरिकन डॉलर)
  • बिल गेट्स (१२९ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • वॉरम बफे (११९ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • लॅरी पेज (११७ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • स्टिव्ह बॉलमर (११२ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • सर्जी ब्रिन (१११ अब्ज अमेरिकन डॉलर)
  • मार्क झुकरबर्ग (११० अब्ज अमेरिकन डॉलर)

(ही आकडेवारी ऑगस्ट २०२३च्या ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीतून घेतली आहे)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.