लडाखमधील लेह जिल्ह्यात लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले. यामुळे 9 सैनिक हुतात्मा झाले. हा अपघात दक्षिण लडाखच्या न्योमा येथील कियारी परिसरात झाला असल्याची माहिती लष्कर अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
लेहचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पी. डी. नित्या यांनी सांगितले की, 10 जवानांसह लष्कराचे वाहन लेहहून न्योमाकडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ते वाहन दुपारी 4.45 वाजता दरीत कोसळले.
(हेही वाचा Hair Fall : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, ‘हे’ घरगुती केसांचं तेल वापरून पाहा)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे जवान हुतात्मा झाल्यामुळे दु:ख झाले आहे. त्यांनी आमच्या देशासाठी केलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही. माझ्या शोक संवेदना त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत, अशी भावना त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.
जखमी जवानांना तातडीने फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तात्काळ उपचार होऊन ते लवकर बरे व्हावेत यासाठी संरक्षण मंत्र्यांनी प्रार्थनाही केली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सैनिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, लडाखमध्ये झालेल्या रस्ता अपघातामुळे आम्ही आमचे शूर सैनिक गमावले, कारण त्यांचे वाहन दरीत कोसळले, त्यामुळे खूप दुःख झाले. संपूर्ण राष्ट्र या दु:खाच्या वेळी शोकाकुल कुटुंबियांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. रुग्णालयात उपचार सुरू असलेले जखमी सैनिक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहेत.
हेही –
Join Our WhatsApp Community