Plastic Ban : प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर महापालिकेकडून कडक कारवाई, 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार

341
Plastic Ban : मुंबईत उद्यापासून प्लास्टिक पिशवी बंद, महापालिकेकडून कडक कारवाई सुरू
Plastic Ban : मुंबईत उद्यापासून प्लास्टिक पिशवी बंद, महापालिकेकडून कडक कारवाई सुरू

मुंबईत प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकदा याबाबत कारवाई करूनही या पिशव्यांचा वापर न करण्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यामुळे महापालिकेने कडक पाऊल उचलण्याचे धोरण स्वीकारले आहे.

प्लास्टिक पिशव्यांबाबत कारवाई करण्यासाठी महापालिकेचे यासाठी महापालिकेने ५ जणांचे पथक तयार केले आहे. हे पथक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई आहे. मुंबईकरांच्या हातात ५० मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या पिशव्या आढळल्यास थेट ५ हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे.आतापर्यंत पालिका फक्त दुकानदारांवरच कारवाई करत होती, मात्र आता गणपती सणाआधी पालिका प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवरही नजर ठेवणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभादेवी येथे भाजी खेरदी करणाऱ्या ग्राहकांनी सांगितले की, महापालिकेचा निर्णय योग्य आहे, मात्र ग्राहकांनाकडून दंड आकारला जाऊ नये. दुकानदार किंवा भाजी विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्या ठेवू नयेत. त्याचबरोबर सरकार आपल्याला दुसरा पर्याय देत नाही.त्यामुळे नागरिकही अशा पिशव्या वापरण्याबाबत बेफिकीर झाले आहेत. तरीही नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे.

(हेही पहाOrgan Donor : देशातील सार्वजनिक रुग्णालयातून अवयव दाते मिळण्यासाठी सक्षम यंत्रणेची गरज – डॉक्टरांचे मत)

नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी उचलले पाऊल…

प्लास्टिक कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पिशव्या झाडांमध्ये अडकतात. गेल्यावर्षी १ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२३ पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ७, ९१,५००० दुकानदारांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर ५२८३.७८२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.बीएमसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीएमसीचे तीन अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा एक अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी असे ५ जणांचे पथक प्रत्येक प्रभागात तैनात केले जाणार आहे, अशी पथके २४ वॉर्डांमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.