Onion Price : कांद्याच्या वाढत्या दरावर केंद्र सरकारचा उपाय, निर्यातीवर लागणार ४० टक्के शुल्क

अर्थ मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू करणारी अधिसूचना केली जारी

201
Onion Prices : आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर?

देशभरात टोमॅटो पाठोपाठ कांद्याच्या दरांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने शनिवारी (१९ ऑगस्ट) कांदा निर्यातीवर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू करणारी अधिसूचना जारी केली आहे. देशातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर क्विंटलमागे २ हजार ते २२०० रुपयांपर्यंत वाढले असून किरकोळ बाजारात कांदा २०-२५ रुपये किलो दराने विकला जात आहे.

(हेही वाचा – Neymar Al Hilal Deal : सौदी क्लबने नेमारला दिलं २५ बेडरुमचं घर आणि खाजगी वापरासाठी जेट)

कांद्याचे भाव २५ टक्क्यांनी वाढले –

महाराष्ट्राच्या लासलगाव मंडईनुसार, ७ जुलै रोजी कांद्याचा घाऊक भाव १३७० रुपये प्रति क्विंटल होता, तो ७ ऑगस्ट रोजी १७५२ रुपये प्रति क्विंटल झाला आहे. मीडिया अहवालानुसार, सरकारकडे २.५ लाख टन कांद्याचा साठा आहे. म्हणजेच इथून पुरवठा वाढवून कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवता येतील. कमोडिटी ऑनलाइननुसार, नाशिकच्या लासलगाव मंडईत भाव २०५० रुपये प्रतिक्विंटल होता.

क्विंटलमागे अधिक मोजावे लागणार इतके रुपये –

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्यासमोर पाकिस्तान आणि चीनच्या कांद्यांची स्पर्धा असतानाच आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सध्याच्या दराप्रमाणे १ क्विंटल कांद्यांमागे निर्यातदारांना १२०० रुपये अधिक मोजावे लागणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे देशातून बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर आणि दुबई येथील कांदा निर्यातीवर परिणाम होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.