Nitesh Rane : संजय राऊत पुढील अधिवेशनापर्यंत खासदार म्हणून राहणार नाहीत! नितेश राणे यांची भविष्यवाणी

141

शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे पुढील अधिवेशनापर्यंत खासदार म्हणून राहणार नाहीत, अशी भविष्यवाणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली. राऊत यांचे वस्त्रहरण सुरु असून त्यामुळे त्यांचा थयथयाट सुरु असल्याची जोरदार टीका राणे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना केली.

मोदी सरकारच्या चांगल्या कामांवर शिक्कमोर्तब

सीमेवरील घुसखोरीबाबत काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या विधानावर नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी चाटण्याचे काम केले असे सांगत राहुल गांधी त्यांनी तिथे किती चांगली बाईक चालवली हे सांगण्याचे काम केले. पण २०१४ पूर्वी राहुल गांधी यांनी कधी लडाखला बाईक चालवण्याचा प्रयत्न केला होता काय? तेथील रस्ते काँग्रेसने कधी चांगले बनवले होते का? बाईक सोडा साधी सायकल चालवण्याइतपत रस्त्यांची स्थिती चांगली होती का, असा सवाल पत्रकार परिषदेत केला. राहुल गांधी यांनी तिथे बाईक चालवल्याचे सांगत एकप्रकारे २०१४नंतर केंद्रात आलेल्या मोदी सरकारच्या चांगल्या कामांवर शिक्कमोर्तब केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जे विरोधक टीका करत आहेत, त्यांना चपलाने मारण्याचे काम गांधी स्वत:च करत असल्याचे सांगत येथील रस्ते चांगले नसते तर तिथे राहुल गांधी तिथे कधीच जावू शकले नसते, असेही सांगितले.

(हेही वाचा Russia : रशियाची चंद्रयान मोहीम अपयशी; यान चंद्रावर कोसळले )

मुंबईत रोहिंग्ये आणि बांगलादेशी मुसलमांनाची घुसखोरी

चीनकडून होणाऱ्या घुसखोरीबाबत संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना नितेश राणे यांनी चीन, लेहलडाख सोडा, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना तसेच शिवसेनेचे महापौर असलेल्या मुंबईत रोहिंग्ये आणि बांगलादेशी मुसलमांनाची घुसखोरी झाली आहे. आज मुंबईतील पाणी ते वापरत आहेत, मोकळ्या जागांवर अतिक्रमण सुरु आहे. त्या घुसखोरीवर बोलण्याची हिंमत यांची होत नाही. त्यांना आधार कार्ड, कागदपत्रे कोणी दिली असा सवाल करत  नितेश राणे यांनी त्याला जबाबदार मातोश्रीत बसणारे त्यांचे मालक असल्याचा आरोप केला. घुसखोरीबाबत राऊत बोलतात, पण पाटकरांच्या घरी घुसखोरी करायची आणि दुसऱ्यावर आरोप करायचे. पण त्यांची अंडी पिल्ली आम्हाला माहित असून त्यांच्या कुंडल्या आम्ही बाहेर काढून तो किती नंगा आदमी आहे हे दाखवून देऊ, असाही इशारा दिला.

म्हणून संजय राऊतांचा थयथयाट

संजय राऊत पुढील अधिवेशनात जाणार नाही, आता त्यांचे वस्त्रहरण सुरु आहे, म्हणूनच त्यांचा थयथयाट सुरु आहे. त्यांना सर्वांची चिंता आहे. दुसऱ्याच्या घरात काड्या लावण्याचे काम हे शकुनीमामा करत आहे, तर त्यांचे वस्त्रहरण करून त्यांचे कपडे फाडण्याची हिंमत आमच्यात आहे, त्यांचे कार्यक्रम कुठे कसे होतात हे माहिती आहे, असाही इशारा दिला. फडणवीस यांना ज्ञानाचे डोस पाजणाऱ्या संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून डावोसला गेले होते, आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रासाठी गेले होते की बॉलीवूडसाठी नंगा नाच करायला गेले होते असा सवाल करतानाच ते जर असेच राहिले तर मालक, मालकाचा मुलगा आणि त्यांना रस्त्यावरुन फिरणेही अवघड होईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिली.

सामना ठाकरेंचा काळा पैसा सफेद करण्याची कंपनी

सामना हे वृत्तपत्र नसून ठाकरेंच्या कुटुंबांचा काळा पैसा सफेद करण्याची कंपनी आहे. त्यामुळे सामनाचा खप किती, त्यांचे उत्पन्न किती, जाहिरात किती याची माहिती आमच्याकडे असून हिंमत असेल तर एका व्यासपीठावर यावे आम्ही सामनावर चर्चा करायला तयार आहोत असे आव्हानही नितेश राणे यांनी दिले. सिनेट निवडणूक रद्द केल्याबाबत बोलताना याची सदस्य नोंदणी ही शिवसेना भवन आणि मातोश्रीवर झाली आहे. या सदस्यांचे पैसे कुणाच्या खात्यावरुन गेले आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना बोलवा एका व्यासपीठावर म्हणजे याची चर्चा होऊन जाईल आणि सत्य समोर येईल. फडणवीस यांच्यावरील टिकेमुळे ठिकठिकाणी सामना वृत्तपत्र जाळण्यात आले. त्यामुळे हा एक ट्रेलर असून हमाममें सब नंगे कसे असतात हे आम्ही दाखवून देऊ असाही इशारा या पत्रकार परिषदेत दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.