Mumbai Crime : मद्यधुंद कारचालकाच्या धडकेमुळे कर्तव्यावरील पोलिसाने गमावला हात

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी चालक विशाल घोरपडे याला अटक

218
Mumbai Crime : मद्यधुंद कारचालकाच्या धडकेमुळे कर्तव्यावरील पोलिसाने गमावला हात
Mumbai Crime : मद्यधुंद कारचालकाच्या धडकेमुळे कर्तव्यावरील पोलिसाने गमावला हात

मुंबईतील कांजुरमार्गमध्ये नाकाबंदीवर ड्युटीवर असलेले पार्कसाइट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वीरेंद्र खवळे यांना एका मद्यधुंद व्यक्तीने कारने धडक दिली. उपनिरीक्षकांना भरधाव कारने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. याप्रकरणात पार्कसाईट पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी चालक विशाल घोरपडे याला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

(हेही वाचा – Supreme Court : उच्च न्यायालयाच्या वेळकाढूपणाविषयी सर्वोच्च न्यायालय नाराज)

जखमी उपनिरीक्षक वीरेंद्र खवळे यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या खांद्यापर्यंतच्या मनगटाचे हाड खराब झाल्याने एक हात कापावा लागणार आहे. “19 ऑगस्टच्या पहाटे कांजूरमार्ग येथील हुमा मॉल परिसरात नाकाबंदीदरम्यान उपनिरीक्षक वीरेंद्र खवळे कर्तव्यावर होते. पोलिसांनी 7-8 पोलिसांसह एलबीएस मार्गावरील हुमा चित्रपटगृहाजवळ विशेष पोलीस नाकाबंदी केली होती. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये असलेल्या विनोद घोरपडेला थांबण्याचा इशारा केला. मात्र, घोरपडेने वेगाने कार चालवत खवळे यांना धडक दिली आणि पळ काढला. धडकेमुळे जखमी झालेल्या खवळे यांना फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, खवले यांना कारला धडक दिल्यानंतर आरोपी पळून गेला आणि भांडुपजवळ गस्ती पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याचा 3 किमीपर्यंत पाठलाग करावा लागला. पार्कसाईट पोलिसांनी कार चालक विशाल घोरपडे याला खुनाचा प्रयत्न, बेदरकारपणे गाडी चालवण्याचा प्रयत्न या कलमांखाली अटक केली आहे. मद्यपान करून वाहन चालवणे आणि मोटार वाहन कायद्याची कलमे जोडणार आहेत, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहेच कारण आरोपीच्या रक्त तपासणी अहवालात उच्च पातळीचे मद्य असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी जखमी उपनिरीक्षक नाकाबंदीच्या ड्युटीवर होते.

“पहाटे दोनच्या सुमारास भांडुप येथून भरधाव वेगात असलेली कार इशाऱ्यानंतरही थांबली नाही आणि तिने बॅरिकेड्सला धडक दिली. पोलिसांनी गाडीचा वेग कमी सांगायला सांगितला होता; पण कारचालकाने पकडले जाण्याच्या भीतीने वेगाने गाडी चालवली आणि पोलीस अधिकाऱ्याला धडक दिली. या धडकेत खवले जखमी झाले,” असे पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक असे विनायक मेहेर यांनी सांगितले.

राज्यातील अपघातांचे प्रमाण वाढले असतांना मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करणा-या पोलिसांवरच हल्ले झाल्यामुळे पोलिसांचे खच्चीकरण होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.