Samruddhi Mahamarg : महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढण्याचा मोह आवरा, नाहीतर तुरुंगात जाल

221
Samruddhi Mahamarg : महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढण्याचा मोह आवरा, नाहीतर तुरुंगात जाल

समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सुरु झाल्यापासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. हजारावर अपघात होऊनही आणि दीडशेच्यावर जीव जाऊनही प्रशासनानं कठोर पावलं उचललेली नव्हती. पण आता प्रशासन सतर्क झालं असून नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) कोणालाही फोटो किंवा रिल्स व्हिडीओ काढता येणार नाही. असं केल्यास त्यांना थेट तुरुंगात जावे लागणार आहे. महामार्ग पोलिसांनी सांगितल्यानुसार, आता महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढणाऱ्यांना ५०० रुपयांच्या दंडासोबत १ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे.

(हेही वाचा – Talathi Exam : तलाठी परीक्षेमधील भोंगळ कारभार; सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा सुरु होण्यास विलंब)

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) काही तरुण फोटो, रील काढण्यासाठी वाहतुकीस अडथळा आणत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर गेल्या आठवड्यात फिरत होते. त्यानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखेनं याची गंभीर दखल घेतली आहे. समृद्धीवर हुल्लडबाजी करणाऱ्यांना आता एक महिन्याची कैद आणि दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याचा इशारा देण्यात आला आहे.

काही तरुण जीव धोक्यात घालून दौलताबाद रोडवरील समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) पुलावर चढून फोटो आणि रील काढत होती. ही मुलं ८० ते १२० किमीच्या वेगानं जाणाऱ्या वाहनांना हात दाखवून वाहतुकीस अडथळा आणतात. असं केल्यास कलम ३४१ नुसार एक महिना कारावास किंवा ५०० रुपये दंड तसेच कलम २८३ नुसार सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही व्यक्तीला धोका किंवा इजा होईल असे कृत्य केल्यास दोनशे रुपये दंड ठोठावण्यात येईल, असं महामार्ग पोलिसांनी सांगितलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.