Electric shock : वाघाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू… पाहा कुठे झाली घटना

वनाधिकाऱ्यांनी केली दोन संशयित आरोपीना अटक

141

शनिवारी नागपूर येथील रामटेक येथे वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मनसर क्षेत्रात वनाधिकाऱ्यांच्या गस्ती पथकाला वाघाचा मृतदेह आढळून आला. वनाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर वाघाचा मृत्यू इलेक्ट्रिक शॉक लागून झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी दोन संशयित आरोपीना अटक केली आहे.

गडचिरोली आणि चंद्रपूर येथील वाघाच्या शिकारीचे प्रकरण देशभर गाजत असताना नागपूर येथील वाघाला इलेक्ट्रिक शॉक देत झालेल्या मृत्यूने पुन्हा वनाधिकाऱ्यांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. मनसर येथील बोंद्री येथे शेत क्रमांक 129 येथे शनिवारी संध्याकाळी वाघाचा मृतदेह आढळून आला. साधारणतः 6 ते 7 वर्षांचा वाघ वनाधिकाऱ्यांना मृतावस्थेत सापडला. रविवारी सकाळी नागपूर येथील ट्रांझिट उपचार केंद्र येथे वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वाघावर अंतिम संस्कार करण्यात आले.

हेही वाचा – Chandrayaan-3 : अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार, ‘या’ ठिकाणी बघता येईल लँडिंगचे थेट प्रक्षेपण)

नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक हरवीर सिंह, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण समितीचे प्रतिनिधी आणि नागपूर वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भाटकर, राज्याच्या मुख्य प्रधान वनसंरक्षक ( वन्यजीव ) माहिप गुप्ता यांचे प्रतिनिधी अविनाश लोंढे, पशुधन विकास अधिकारी डॉ राजेंद्र रेवतकर, डॉ स्मिता रामटेके, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सुदर्शन काकडे, डॉ राजेश फुलसंगे, डॉ सुजीत कोलंगत आणि राज्याच्या वन्यजीव बोर्डाचे माजी सदस्य कुंदन हाते यावेळी उपस्थित होते. दोन्ही संशयित आरोपीना न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती नागपूरचे उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा यांनी दिली

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.