BMC : पालिका रुग्णालयात बोगस डॉक्टर प्रकरणानंतर प्रशासनाचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर

अतिदक्षता विभागात डॉक्टरांचे आउटसोर्सिंग बंद होण्याची शक्यता

206
BMC : पालिका रुग्णालयात बोगस डॉक्टर प्रकरणानंतर प्रशासनाचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर
BMC : पालिका रुग्णालयात बोगस डॉक्टर प्रकरणानंतर प्रशासनाचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. डॉक्टरांचे आउटसोर्सिंग सुरू केल्यानंतर मुलुंड येथील पालिका रुग्णालयात बोगस डॉक्टरांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शासनाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. उपनगरीय पालिका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टरांचे आउटसोर्सिंग बंद होण्याची शक्यता विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याबद्दल लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

पालिका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात गैरव्यवहार आणि बोगस डॉक्टर पुरवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जीवन ज्योत चेरीटेबल ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जीवन ज्योत चेरीटेबल ट्रस्टने मुंबईल विविध पालिका रुग्णालयात तब्बल शंभरहून अधिक डॉक्टर्स पुरवल्याचे पोलिसांच्या तपासाअंती उघडकीस आले.

(हेही वाचा – Onion Prices : निर्यात शुल्कामध्ये वाढ होताच कांद्याचे दर हजार रुपयांनी पडले; शेतकरी संतप्त) 

संपूर्ण प्रकरण –
2018 साली गोल्डी शर्मा यांनी मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या आपल्या नातेवाईकाला गमावले. माहितीअधिकाराचा वापर करत शर्मा यांना अग्रवाल रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती मिळाली. 17 फेब्रुवारी ते 22 नोव्हेंबर 2018 याकाळात रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 149 मृत्यू झाले होते. सर्व 149 रुग्णांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका सांगण्यात आले.
शर्मा यांना रुग्णांच्या मृत्यूप्रकरणात संशय आला. चौकशीअंती अतिदक्षता विभागातील डॉक्टर्स महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत नसल्याचे शर्मा यांना समजले. अखेरीस शर्मा यांनी मुलुंड पोलिस स्थानकात रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार केली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी चंद्रशेखर भूलईराम यादव (32), सुशांत रामचंद्र जाधव (30) या दोन बोगस डॉक्टरांना अटक केली. त्यासह जीवन ज्योत चेरीटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी सुरेखा चव्हाण, विश्वस्त बिरेंद्र यादव आणि दीपक जैनला अटक करण्यात आली. संस्थेकडून पुरवण्यात आलेले शंभर डॉक्टरांचा तपशील मुलुंड पोलिस गोळा करत आहेत. काही बोगस डॉक्टर्स गायब झाल्याचा संशयही मुलुंड पोलिसांनी व्यक्त केला.
जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था पालिकेच्या तीन प्रिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टरांचे आउटसोर्सिंग पुरवत होती. पोलीस प्रकरणानंतर येत्या चार महिन्यात करांचे आऊटसोर्सिंग बंद होण्याची दाट शक्यता आहे. अंतिम निर्णय घेण्याकरिता उपनगरीय रुग्णालयांच्या मुख्य वैद्यकीय अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक समिती ही स्थापन करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील डॉक्टरांचीच नियुक्ती अतिदक्षता विभागात केलीआहे जाणार आहे. मुंबईत आता पावसाळी आजार वाढू लागल्याने डॉक्टरांची गरज मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. त्यासाठी प्राधान्याने डॉक्टरांना अतिदक्षता विभागात नियुक्त केले जात आहे. डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षणही सुरू करण्यात आले आहे, असेही पालिका आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.