Onion Prices : निर्यात शुल्कामध्ये वाढ होताच कांद्याचे दर हजार रुपयांनी पडले; शेतकरी संतप्त

169
Onion Prices : निर्यात शुल्कामध्ये वाढ होताच कांद्याचे दर हजार रुपयांनी पडले; शेतकरी संतप्त

केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात (Onion Prices) शुल्क ४० टक्के वाढवताच रविवारी (२० ऑगस्ट) संतप्त शेतकऱ्यांचा आक्रोश नाशिकसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलनांतून व्यक्त झाला. काही ठिकाणी सरकारच्या आदेशाची होळी करण्यात आली, तर कुठे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. दरम्यान, अनेक शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय नाशिक जिल्हा कांदा असोसिएशनने रविवारी घेतला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीमध्ये रविवारी कांदा भावात (Onion Prices) एक हजार रुपयांपर्यंत घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून दीड तास रास्ता रोको केला. येथे शनिवारी (१९ ऑगस्ट) प्रतिक्विंटल २२०० ते २५०० भाव होता तो रविवारी १६०० रुपये झाला.

(हेही वाचा – Samruddhi Mahamarg : महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढण्याचा मोह आवरा, नाहीतर तुरुंगात जाल)

५ लाख टन बफर स्टॉकसाठी सरकार २ लाख टन कांदा खरेदी करणार

यंदा ५ लाख टनांचा बफर स्टॉक राखण्यासाठी केंद्र सरकार अतिरिक्त २ लाख टन कांदा खरेदी (Onion Prices) करणार आहे. कांदा निर्यातीवर ४०% शुल्क लादल्यानंतर केंद्राने ही घोषणा केली. २०२२-२३ साठी कांद्याच्या बफरचे उद्दिष्ट ३ लाख टन होते. तेे आधीच खरेदी केले आहे. स्थानिक उपलब्धतेसाठी व दरवाढ रोखण्यासाठी निवडक राज्यांत समान बफर स्टॉक वापरला जात आहे.

बफरमधील कांदा २५ रुपये किलोने मिळणार : बफरमधील कांदा (Onion Prices) ग्राहकांना २१ ऑगस्टपासून किरकोळ आउटलेट्स आणि एनसीसीएफच्या मोबाइल व्हॅनद्वारे २५ रुपये प्रतिकिलो अनुदानित दराने प्रमुख बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.