Chandrayaan 3 Moon Pics : ‘चांद्रयान-३’ने टिपले चंद्राचे नवीन फोटो

बुधवार २३ ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरेल.

178
Chandrayaan 3 Moon Pics : 'चांद्रयान-३'ने टिपले चंद्राचे नवीन फोटो

भारताची चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Moon Pics) ही मोहिम यशस्वीपणे पुढे जात आहे. ही मोहीम आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यानाने बुधवारी (१६ ऑगस्ट) सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास चंद्राच्या शेवटच्या कक्षेत प्रवेश केला. चांद्रयानाचे आता सर्व कक्षा बदल पूर्ण झाले असून इस्रोकडून आता यान चंद्रावर उतरवण्याची तयारी सुरु झाली आहे.

अशातच विक्रम लँडरवरील (Chandrayaan-3 Moon Pics) कॅमेऱ्याने चंद्राचे काही आणखी फोटो टिपले आहेत. इस्रोने आपल्या ट्विटर हँडलवरून हे फोटो शेअर केले आहेत.

इस्रोने आपल्या ट्विटर पोस्ट मध्ये याबाबत अधिक माहिती दिली आहे. चंद्राचे हे फोटो (Chandrayaan-3 Moon Pics) लँडर हॅजार्ड डिटेक्शन अँड अव्हॉईडन्स कॅमेऱ्याने (LHDAC) टिपले आहेत. हा कॅमेरा चांद्रयानाच्या लँडिंगसाठी सुरक्षित जागा शोधण्यास मदत करेल. चंद्रावर बहुतांश ठिकाणी खडकाळ आणि खड्डे असलेली जमीन आहे. त्यामुळे लँडिंगसाठी एखादी सपाट जागा शोधणं गरजेचं आहे. यासाठी हा कॅमेरा उपयोगी ठरणार आहे.

‘चांद्रयान-3’ने (Chandrayaan-3 Moon Pics) टिपलेले हे फोटो चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील आहेत. चंद्राचा हा भाग आतापर्यंत मानवापासून लपून राहिला होता. या फोटोंमध्ये चंद्रावरील विविध क्रेटर्स दिसत आहेत.

(हेही वाचा – Onion Prices : निर्यात शुल्कामध्ये वाढ होताच कांद्याचे दर हजार रुपयांनी पडले; शेतकरी संतप्त)

बुधवार २३ ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या (Chandrayaan-3 Moon Pics) दक्षिण गोलार्धात उतरेल.

काही दिवसांपूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने चांद्रयान 3 (Chandrayaan-3 Moon Pics) मोहिमेअंतर्गत चंद्राचा पहिला फोटो प्रसिद्ध केला. भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेला आलेलं हे पहिलं यश आहे. चांद्रयान 3 ने (Chandrayaan-3) शनिवारी (५ ऑगस्ट) चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ही छायाचित्रं घेतली आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.