CIDCO Mass Housing Lottery : सल्लागार आणि व्यवस्थापनातील वादामुळे रखडली सिडकोची ‘मास हौसिंग’ लॉटरी

184
Housing Prices in Mumbai : सणाच्या दिवसांत मुंबईतील घरांच्या किमती घटल्या, घर खरेदीची चांगली संधी?

गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेली सिडकोची मास हौसिंग लॉटरी (CIDCO Mass Housing Lottery) १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी जाहीर केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सल्लागार कंपनी आणि सिडको व्यवस्थापनातील वादामुळे ही लॉटरी रखडल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या (CIDCO Mass Housing Lottery) माध्यमातून ६७ हजार घरांची निर्मिती केली जात आहे. या घरांचे मार्केटिंग, ब्रँडिंग आणि विक्रीसाठी ‘हेलिओस मीडिया आणि थ्रोट्रिन डिझाइन प्रा. लि.’ या संयुक्त भागीदारीतील सल्लागार कंपनीला ६९९ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या सल्लागार कंपनीच्या नियुक्तीला जवळपास एक वर्ष झाले. मात्र, या काळात सिडकोची कोणतीही नवीन गृहयोजना जाहीर झाली नाही किंवा या सल्लागार कंपनीद्वारे सिडकोचे एखादे घरसुद्धा विकले गेले नाही.

(हेही वाचा – Shrimadbhagwatgita: कानपूर विश्वविद्यालयात गीता चेअरची स्थापना, गीतेतील अगाध ज्ञानाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार)

अशात आता या कंपनीने (CIDCO Mass Housing Lottery) घरांच्या जाहिरातीसाठी १५० कोटी रुपये खर्चाचा वेगळा प्रस्ताव व्यवस्थापनासमोर ठेवला आहे. त्यात वृत्तपत्रे, रेडिओ आणि आऊट ऑफ होम, आदी नॉनडिजिटल जाहिरातीवर ४० कोटी, सोशल मीडिया, सर्च इंजिन ऑप्टिमाझेशन, अशा डिजिटल जाहिरातबाजीवर ४८ कोटी ५० लाख, सामुदायिक कार्यक्रम, पीआर अॅक्टिव्हिटीवर ४ कोटी, एव्ही सेटअप, स्पेस सेटअप, डिजिटल व आयटी सेटअप उभारणे आणि इव्हेंट मॅनेजमेंटसाठी दोन मेगा एक्सपीरिअन्स सेंटर उभारणीकरिता १० कोटी, मार्केटिंग कोलॅटरल्सवर ४ कोटी, फोटोशूट, ड्रोनशूट रेंडर्स, वॉकसाठी ४ कोटी असा एकूणच १५० कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. हा जाहिरात आराखडा ४२ महिने अधिक २४ महिन्यांसाठी असेल, असे प्रस्तावात म्हटले आहे.

मात्र, घरांचे (CIDCO Mass Housing Lottery) मार्केटिंग, ब्रँडिंग आणि विक्रीसाठी आधीच ६९९ कोटींचे कंत्राट दिलेले असताना आणखी १५० कोटींचा खर्च करण्यास सिडको व्यवस्थापनाने विरोध केला आहे. त्यामुळे सल्लागार कंपनी आणि व्यवस्थापनातील वादात सिडकोची बहुप्रतिक्षित मास हौसिंग लॉटरी रखडल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.