Acharya Pramod Krishnam : काँग्रेसच्या मनात हिंदू साधू – संतांचा तिरस्कार भरला आहे; आचार्य प्रमोद कृष्णन यांची घोर उपेक्षा

157
Acharya Pramod Krishnam : काँग्रेसच्या मनात हिंदू साधू - संतांचा तिरस्कार भरला आहे; आचार्य प्रमोद कृष्णन यांची घोर उपेक्षा

वंदना बर्वे

काँग्रेस पक्षाच्या मनात हिंदु साधू – संतांविषयी किती तिरस्कार भरला आहे याची प्रचिती काल (रविवार, २० ऑगस्ट) पुन्हा एकदा आली आहे. काँग्रेसचे फायर ब्रॅंड प्रवक्ते आचार्य प्रमोद कृष्णन (Acharya Pramod Krishnam) यांची पक्षाने घोर उपेक्षा केली आहे.

कॉंग्रेस (Acharya Pramod Krishnam) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल रविवारी कॉग्रेस कार्यकारिणी जाहीर केली. यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह 39 नेत्यांना कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांची यावेळची काँग्रेस कार्यकारणी (Acharya Pramod Krishnam) जंबो आहे. 39 सदस्य, 32 स्थायी निमंत्रित आणि 13 विशेष आमंत्रित अशा 84 सदस्यांची ही कार्यकारणी आहे. यात खर्गे यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे शशी थरूर आणि राहुल गांधी यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविणारे जी – 23 गटाच्या नेत्यांना सुध्दा स्थान मिळाले आहे.

(हेही वाचा – CIDCO Mass Housing Lottery : सल्लागार आणि व्यवस्थापनातील वादामुळे रखडली सिडकोची ‘मास हौसिंग’ लॉटरी)

एवढेच नव्हे तर, प्रवक्त्या सुप्रिया श्रिनेत, अल्का लांबा, आ. प्रणिती शिंदे, सचिन पायलट, गौरव गोगोई आणि मीनाक्षी नटराजन यांच्यासारख्या तरूण नेत्यांना स्थान मिळाले आहे.

परंतु, राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर काँग्रेसचा किल्ला लढविणारे आचार्य प्रमोद कृष्णन (Acharya Pramod Krishnam) यांना या यादीत स्थान देण्यापासून काँग्रेसने स्वत:ला लांब ठेवले, ही दुर्दैवाची बाब आहे. मुळात, भारतीय जनता पक्षाच्या कट्टर हिंदुत्ववादाला कडाडून विरोध करणारे अशी कृष्णन यांची ओळख आहे. देशातील संत समाजामध्ये त्यांना सन्मानाने बघितले जाते. यावरून सहज लक्षात येते की, काँग्रेसच्या मनात साधू संतांविषयी किती द्वेष भरला आहे.

दरम्यान, काँग्रेसने (Acharya Pramod Krishnam) केलेल्या उपेक्षेमुळे आपण फार दुखावलो असल्याची भावना आचार्य कृष्णन यांनी व्यक्त केली आहे. ‘माझी वेशभूषा आणि कपाळावर टिळक लावणे काँग्रेसमधील काही नेत्यांना आवडत नाही. मात्र, या जन्मात तरी मी या गोष्टींचा त्याग करू शकणार नाही’, अशा शब्दात कृष्णन (Acharya Pramod Krishnam) यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.