पायाच्या दुखण्याने जवळपास सहा वर्षे अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या पायावर मुंबई सेंट्रल येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी चालू लागला. सुधीर पाटील या ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पायाच्या दुखण्याचा त्रास होता. व्हेसिक्युलर क्लाउडिफिकेशन आजारामुळे सुधीर पाटील सहा वर्षात असे घराबाहेर पडू शकले नाही.
परिणामी, पाटील जवळपास सहा वर्ष चालू शकले नाही. पाटील यांच्या पायाच्या दुखण्याचे नेमके निदान बरीच वर्ष होत नव्हते. मुंबई सेंट्रल येथील खाजगी रुग्णालयात सुधीर पाटील यांनी उपचार सुरू केले. तपासणीअंती सुधीर पाटील यांना व्हेसिक्युलर क्लाउडिफिकेशन हा गंभीर आजार असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.
व्हेसिक्युलर क्लाउडिफिकेशन आजाराबद्दल –
व्हेसिक्युलर क्लाउडिफिकेशन या आजारात पायाच्या नसा जाम होतात. पायात रक्तपुरवठा पुरेसा होत नाही. व्हेसिक्युलर क्लाउडिफिकेशन आजारात पायाच्या नसा नेमक्या कोणत्या भागात जाम झाल्या आहेत हे कळत नाही. पाटील यांच्या केसमध्ये नसा जाम झालेल्या पायाचा भाग डॉक्टरांना सापडत नव्हता. डॉक्टरांनी रुग्णावर डॉपलर चाचणी करून पाहिली. डॉपलर चाचणीत जाम झालेल्या पायाच्या नसा सापडल्या नाहीत. सुधीर पाटील यांच्यावर डॉक्टरांनी डिजिटल सबस्ट्रक्शन अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला.
(हेही वाचा – CIDCO Mass Housing Lottery : सल्लागार आणि व्यवस्थापनातील वादामुळे रखडली सिडकोची ‘मास हौसिंग’ लॉटरी)
शस्त्रक्रियेची पद्धत –
डिजिटल सबस्ट्रक्शन अँजिओग्राफी ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची आणि फारच आव्हानात्मक असते. रुग्णाच्या हृदयातील महाधमनी ९० टक्के जाम झाली होती. शस्त्रक्रिया रुग्णाच्या जीवावरही बेतू शकत होती. परंतु, डॉक्टरांनी हे आव्हान पेलले. शस्त्रक्रियेला सुधीर पाटील यांनी संमती दिली. इंटरव्हेनशनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अशोक बंसल आणि डॉक्टर अभिजीत सोनी यांनी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या शरीराची कमीत कमी चिरफाड केली. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी रुग्ण चालू लागला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community