बहुप्रतीक्षित आशिया चषकासाठी (Asia Cup 2023) भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने आज म्हणजेच सोमवार २१ ऑगस्ट रोजी ही घोषणा केली.
त्यानुसार रोहित शर्मा कर्णधारपदी, (Asia Cup 2023) राहुल-बुमराह आणि श्रेयसचे पुनरागमन आणि ४थ्या क्रमांकावर तिलक वर्मा, सूर्याचा समावेश करण्यात आहे .
रोहित शर्मा कर्णधार (Asia Cup 2023) तर हार्दिक पांड्याकडे संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे संघात पुनरागमन झाले तर फिरकीपटू युजवेंद्र चहलला आराम देण्यात आला आहे. सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या बुमराहला संघात स्थान मिळाले आहे. सध्या जसप्रीत बुमराहचा फॉर्म देखील उत्तम आहे.
फलंदाज सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांची सर्वाधिक चर्चेत असलेल्या क्रमांक-४ वर निवड झाली आहे. नवी दिल्लीत सोमवारी दुपारी दीड वाजता झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआयने (Asia Cup 2023) पत्रकार परिषदेत संघाची माहिती दिली.
Here’s the Rohit Sharma-led team for the upcoming #AsiaCup2023 🙌#TeamIndia pic.twitter.com/TdSyyChB0b
— BCCI (@BCCI) August 21, 2023
आशिया कपसाठीचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा. बॅकअप यष्टिरक्षक- संजू सॅमसन.
आशिया चषक ३० ऑगस्टपासून (Asia Cup 2023) पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेत भारताला पाकिस्तान आणि नेपाळसह अ गटात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला स्थान देण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community