दिवसाची सुरुवात चहा पिऊन करण्याची बऱ्याच लोकांना सवय असते. यामध्ये दुधाचा चहा आणि ग्रीन टी पिणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर पडायला तसेच वजनवाढीवरही नियंत्रण राहाते. फिटनेसबाबत काळजी घेणाऱ्यांमध्ये ग्रीन टी पिण्याचे प्रमाण जास्त आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी सकाळी व्यायाम केल्यानंतर रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन केले जाते.
ग्रीन टी प्यायल्याने त्वचेची गुणवत्ता सुधारते. चयापचय क्रिया वाढते. उत्साह टिकून राहायला मदत होते, असे अनेक फायदे ग्रीन टी पिण्याचे असले तरी यामुळे काही प्रमाणात नुकसान होण्याचीही शक्यता असते. बहुतांश लोकांना ग्रीन टी नेमका कोणत्या वेळी आणि तो पिण्याची पद्धत याविषयी माहिती नसते. जाणून घ्या ग्रीन टीचे सेवन करण्याची पद्धत –
(हेही वाचा – Asia Cup 2023 : बीसीसीआयकडून आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; जाणून घ्या कोणाकोणाचा समावेश )
आहारतज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने पोटदुखी होऊ शकते. ग्रीन टीमध्ये टॅनिन म्हणून ओळखले जाणारे पॉलीफेनोल्स असतात. यामुळे पोटातील आम्लाचे प्रमाण वाढते. यामुळे पोटदुखी, जळजळ, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे ग्रीन टीचे सेवन नेहमी जेवणानंतर करावे. यामध्ये कॅफिन असते. त्यामुळे काहीही न खाता ग्रीन टीचे सेवन केल्यास चक्कर येणे, उलटी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
रिकाम्यापोटी सेवन करू नका –
नाश्त्यापूर्वी 1 तास आधी ग्रीन टीचे सेवन करावे. सकाळी आणि सायंकाळी 1 कप ग्रीन टी प्यायल्याने चयापचय क्रिया वाढायला मदत होते. यामुळे वजनवाढीवर नियंत्रण राहते. दिवसभरात 3 ते 4 कपांपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नये. काही जणांना ग्रीन टीमध्ये दूध किंवा साखर मिसळून पिण्याची सवय असते. ग्रीन टीमध्ये साखर आणि दूध मिसळणे टाळा. खाल्ल्यानंतर लगेच ग्रीन टी पिणे धोकादायक ठरू शकते.
ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ –
दिवसभरात 3 ते 4 कप ग्रीन टी प्यायला हरकत नाही. ग्रीन टीचे सेवन जास्त केल्याने यकृताचा त्रास होऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टीचे सेवन करू नका तसेच जेवणानंतर लगेचच ग्रीन टी पिणे हानीकारक ठरू शकते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर –
ग्रीन टीमध्ये अँण्टीऑक्सिडंटस् असतात. ज्यामुळे चयापचय क्रिया वाढायला मदत होते. यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण राहाते.
ह्रदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी –
दररोज 1 ते 2 कप ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहायला मदत होते. ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरते.
हेही पहा –