वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) च्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. भारतात पांढऱ्या-निळ्या रंगात वंदे भारत चालू आहे. आता कंपनीने या ट्रेनला नवीन कलर कॉम्बिनेशन दिले आहे. आता ती आकर्षक अशा भगव्या रंगात दाखल झाली आहे. भारतीय कोच फॅक्टरी (ICF) ने ते नुकतेच चाचणीसाठी पाठवले असले तरीही ICF चे महाव्यवस्थापक BG मल्ल्या यांनी सांगितले की भगवा हा आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग आहे, ज्याला ICF (Integral Coach Factory) ने राखाडी-पांढऱ्या रंगाला जोड देण्यात आली आहे. त्यामुळे आकर्षक असे रूप या गाडीचे दिसत आहे अधिक सुरक्षितता आणि तांत्रिक सुधारणा असलेल्या या गाडीची बांधणी चेन्नईतील रेल्वे कारखान्यात सुरू आहे. तेथेच या गाडीची शनिवारी चाचणी घेण्यात आली.
रेल्वे मंडळाने दिलेल्या उद्दिष्टानुसार गेल्या वर्षांपासून चेन्नईतील प्रकल्पात दोन हजार ७०२ रेल्वे डब्यांची निर्मिती करण्यात आली आहे. चालू वर्षांत या प्रकल्पातून ३० प्रकारच्या तीन हजार २४१ डब्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यात नव्या स्वरूपाच्या वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. याच वर्षी वंदे भारत गाडय़ांचे ‘वंदे मेट्रो’ रूप सादर केले जाणार आहे. ही गाडी शहरांतर्गत जवळच्या अंतरासाठी वापरण्यात येईल. गाडीत सहजपणे चढता आणि उतरता यावे, यासाठी तिला समांतरपणे दोन्ही बाजूला उघडणारे दरवाजे असतील.
जम्मू आणि काश्मीर भागात तापमान गोठण बिंदूजवळ असते. त्यामुळे तेथे चालविल्या जाणाऱ्या वंदे भारत गाड्यांच्या डब्यात उष्ण तापमान करण्याची सुविधा आणि जलवाहिनी गोठू नये, अशी यंत्रणा विकसित केली जात आहे. पुढील वर्षी ही गाडी तयार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मालवाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी गतिशक्ती गाड्या विकसित केल्या जात आहेत. ई-कॉमर्ससह जलद वाहतूक गरजेची असणाऱ्या वस्तूंसाठी या गाड्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.
(हेही वाचा:Sanjay Raut : संजय राऊत ईशान्य मुंबईतून निवडणूक लढणार?)
ही आहेत वैशिष्ट्ये –
- वंदेभारत मध्ये आरमार तंत्रज्ञान आहे. लोको पायलटने चुकून रेड सिग्नल चुकवल्यास हे तंत्रज्ञान त्याला लवकरच अलर्ट करेल. त्यामुळे गाड्यांमधील अपघातांची शक्यता कमी होईल.
- वंदे भारतचा वेग ताशी १८० किमी आहे.
- वंदे भारतच्या प्रत्येक डब्यात सस्पेंडेड ट्रॅक्शन मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवास जास्त वेग असूनही सुरळीत आणि आरामदायी होतो.
- वंदे भारतमध्ये (Vande Bharat Express) इंटेलिजेंट ब्रेकिंग सिस्टीम आहे जी 30 टक्क्यांपर्यंत विजेची बचत करते.
विमान आणि मेट्रो ट्रेनप्रमाणेच, वंदे ही भारतातील एक प्रगत प्रणाली आहे, ज्यामुळे लोको पायलट ट्रेनमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीशी बोलू शकतो.
लवकरच स्लीपरचीही सोय –
लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवासी शयनयान (स्लीपर) सुविधा असलेल्या रेल्वे गाड्यांना प्राधान्य देतात. सध्या वंदे भारत गाड्यांमध्ये अशी सुविधा नाही. त्यामुळे स्लीपर सुविधा असलेल्या वंदे भारत गाड्यांची निर्मिती करण्याचे नियोजन सुरू आहे. या वर्षांच्या अखेरपर्यंत त्यावर शिक्कामोर्तब होईल.
हेही पहा:
Join Our WhatsApp Community