ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सौराष्ट्राच्या समुद्रकिनारी गांजाची २७२ पाकिटे सापडली होती, आता महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने गांजाची पाकिटे सापडली आहेत, त्यामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम टोकाला समुद्रकिनारी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे ड्रग्ज समुद्राच्या लाटांनी तरंगणाऱ्या पॅकेट्सच्या स्वरूपात किनाऱ्यावर आढळून आले. रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनाऱ्यांवरून सीमाशुल्क विभागाने 250 किलोहून अधिक ड्रग्जची पाकिटे ताब्यात घेतली.
प्रशासनाकडून आधीच निर्बंध असलेल्या या प्लास्टिकच्या पिशव्यांचे पॅकेट्स 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या किनाऱ्यांवर वाहून आले. कर्डे, लाडघर, केळशी, कोलथरे, मुरुड, बुरुंडी, दाभोळ आणि बोर्या समुद्रकिनाऱ्यांवर ही ड्रग्जची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर वाहून आलेली ड्रग्जची पाकिटे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, असा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. ही अंमली पदार्थांची पाकिटे एकतर समुद्रात पडली असतील किंवा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या उद्देशाने परदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशयही सीमाशुल्क विभागाकडून व्यक्त केला जात आहे. तपासाअंती चरस (हशीश) असल्याचे निष्पन्न झाले. 15 ऑगस्ट रोजी कर्डे ते लाडघर समुद्रकिनारी सुमारे 35 किलो चरस असलेली प्लास्टिकची पाकिटं आढळून आली. 16 ऑगस्ट रोजी केळशी समुद्रकिनाऱ्यावरून 25 किलो आणि कोलथरे समुद्रकिनाऱ्यावरून 13 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. 17 ऑगस्ट रोजी मुरुड येथून 14 किलोंपेक्षा जास्त बुरुंडी ते दाभोळ खाडीदरम्यान 101 किलो, तर बोर्या येथून 22 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. नंतर, कोलथरे समुद्रकिनाऱ्याच्या खडकाळ भागातही मोठ्या प्रमाणावर चरस असलेली पाकिटे आढळून आली.
(हेही वाचा Chandrayaan-3 : अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार, ‘या’ ठिकाणी बघता येईल लँडिंगचे थेट प्रक्षेपण)
गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरही अंमली पदार्थ आढळले
गेल्या वर्षी 2022 मध्ये गुजरातमधील पोरबंदर आणि जुनागढ जिल्ह्यात समुद्र किनाऱ्या लगतच्या भागातही ड्रग्जचे पॅकेट्स वाहून आल्याचे पाहायला मिळाले होते. तब्बल 59 प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केलेले ड्रग्ज किनाऱ्यावर आढळून आले होते. प्रत्येक पॅकेटचे वजन सुमारे एक किलो होते. जुनागडमधील मंगरोळ आणि पोरबंदरमधील माधवपूर येथून संशयित ड्रग्ज असलेली पाकिते जप्त करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community