भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-3 (Chandrayaan – 3) साठी येणारे दोन दिवस फार महत्वाचे आहेत. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. मात्र त्याआधीच चंद्रयान-2 ने चंद्रयान-3 भेटल्याचे आधी इस्रोला कळवले. चंद्रयान-3 चे फोटो इस्रोला पाठवले आहेत.
ISRO ने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 (Chandrayaan – 3) चा संपर्क झाला आहे. इस्रोने ट्विटद्वारे ही माहिती दिली. 2019 मध्ये भारताने आपले मिशन चंद्रयान-2 लॉन्च केले होते, पण अगदी शेवटच्या क्षणी चंद्रयान-2 चे लँडर क्रॅश झाले, पण याचे ऑर्बिटर गेल्या 4 वर्षांपासून चंद्राभोवती फिरत आपले काम करत आहे. आता चार वर्षांनंतर विक्रम लँडर पुन्हा चंद्राजवळ पोहोचले असून, यामुळे चंद्रयान-2 चे ऑर्बिटर सक्रिय झाले आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चंद्रयान-3 (Chandrayaan – 3) च्या लँडर मॉड्यूलचे स्वागत केले. दोघांमध्ये द्विपक्षीय संपर्कही प्रस्थापित झाला आहे. ISRO ने चंद्रयान-3 च्या लँडिंगसाठी 23 ऑगस्ट संध्याकाळी 6.4 मिनिटांनी वेळ निश्चित केली आहे. सर्व काही ठीक झाले, तर यावेळी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि आपले पुढील काम सुरू करेल. चंद्रावर सूर्य उगवताच विक्रम लँडरचे काम सुरू होईल आणि प्रज्ञान रोव्हर 14 दिवस चंद्रावर संशोधन करेल. प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरच्या जवळपास असेल, तिथून दोघांच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या जातील.
Join Our WhatsApp Community