Mumbai University : वसतिगृह खुले करण्यासाठी अभाविपचे ‘एक दिवसीय लाक्षणिक उपोषण’

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय, उदघाटन होऊन लोटला वर्षभराचा कालावधी

146
Mumbai University : वसतिगृह खुले करण्यासाठी अभाविपचे ‘एक दिवसीय लाक्षणिक उपोषण’
Mumbai University : वसतिगृह खुले करण्यासाठी अभाविपचे ‘एक दिवसीय लाक्षणिक उपोषण’

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) सांताक्रुझ येथील कलिना संकुलात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वसोयीनेयुक्त असे वसतिगृह बांधले आहे. परंतु उद्घाटन होऊन एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही हे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही. यामुळे येथील विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) कलिना संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोमवारी ‘एक दिवसीय लाक्षणिक उपोषण’ पुकारले आहे.

मुंबई महानगरातील अभाविपच्या ४० ते ५० विद्यार्थ्यांनी या लाक्षणिक उपोषणात सहभाग घेतला होता तर याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात बांधण्यात आलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे नवीन वसतिगृह हे सहा मजली आहे. १४६ विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या वसतिगृहात वाचन कक्ष, ग्रंथालय आदी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या वसतिगृहाचे उद्घाटन जुलै २०२२ मध्ये तत्कालीन कुलपती व माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु उद्घाटनाच्या एक वर्षानंतरही हे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात न आल्यामुळे अभाविपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

(हेही वाचा : Students Attempted Suicide : ‘या’ कारणामुळे २२ विद्यार्थ्यांची आत्महत्या)

विद्यार्थ्यांचा वसतिगृहात विदयुत सुविधा, पाण्याची मुबलक व्यवस्था, उपाहारगृहाची व्यवस्था आदी विविध सोयीसुविधांबाबत कालबद्ध कार्यक्रम विद्यापीठाने लिखित स्वरुपात द्यावा, अशी आमची मागणी आहे, ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल अशी प्रतिक्रियाही विद्यार्थ्यांनी दिली. अभाविपचे कोकण प्रदेशमंत्री अमित ढोमसे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह खुले करण्यासाठी अभाविपने वारंवार पाठपुरावा करूनही विद्यापीठ प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्यामुळे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे.

हेही पहा  –

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.