नियमित मासे खाल्ल्यामुळेच डोळे ऐश्वर्या रायसारखे सुंदर होणार असतील तर आतापर्यंत माझे डोळेही सुंदर व्हायला हवे होते. आम्ही कोकणातील लोक तर रोजच मासे खातो. मग कोकणातील सर्वच लोकांचे डोळे सुंदर झाले पाहिजे, असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी मंत्री विजयकुमार गावित यांना लगावला.
गावितांनी कुठले संशोधन केले विचारावे लागेल
भाजप नेते विजयकुमार गावित यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना ‘नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले’ असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना नितेश राणे यांनी असे असेल तर कोकणातील सर्वांचेच डोळे सुंदर व्हायला हवे, असा टोला गावितांना लगावला. गावीत यांनी असे कुठले संशोधन केले आहे काय ते विचारावे लागेल, असेही राणे म्हणाले.
संजय राऊतांचे डिपॉझिट जप्त कसे करू
संजय राऊत यांनी मुंबईमधून लोकसभा लढवण्याची तयारी करण्यापेक्षा रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून लढवण्याचे मी त्यांना आव्हान देतो. डिपॉझिट कसे जप्त होते, संजय राऊत यांची काय इज्जत आहे हे पूर्ण राज्याला कळेल. म्हणून हिम्मत असेल तर रत्नागिरीमधून निवडणूक राऊत यांनी लढवून दाखवावी असे आव्हान दिले.
गडकरींना ऑफर देणे म्हणजे ठाकरे नालायक
विनायक राऊत यांनी नितीन गडकरींना ऑफर देऊन उद्धव ठाकरे नालायक आहे हे स्वीकारले आहे. संजय राऊत बोलायचे की उद्धव ठाकरे यांनी देशाचे नेतृत्व करावे. विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना नालायक सिद्ध केले. नितीन गडकरी हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असून संघाच्या तालमीत तयार झालेले आहे.
Join Our WhatsApp Community