META लवकरच थ्रेड्सची वेब आवृत्ती करणार लाँच

122

META कंपनी वेब प्लॅटफॉर्मवर अंतर्गत चाचणी करत आहे, 1 महिन्यापूर्वी लॉन्च करण्यात आले होते. मेटा पुढील आठवड्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रेड्सची वेब आवृत्ती लॉन्च करू शकते. वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, कंपनी पुढील आठवड्याच्या सुरुवातीला थ्रेड्सची वेब आवृत्ती लाइव्ह करण्याचा विचार करत आहे. मात्र, अद्याप प्लॅन फायनल झाला नसून कंपनी त्यात बदल करू शकते.

मागील आठवड्याच्या सुरुवातीला, थ्रेड्स आणि इंस्टाग्रामचे सीईओ अॅडम मोसेरी म्हणाले की थ्रेड्सच्या वेब आवृत्तीची अंतर्गत चाचणी केली जात आहे. थ्रेड्सवरील वेब आवृत्तीशी संबंधित पोस्टला प्रतिसाद देताना, मोसेरी म्हणाले, ‘आम्ही यावर काम करत आहोत! आम्ही एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ अंतर्गत प्रारंभिक आवृत्ती वापरत आहोत. तथापि, ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याआधी अजून काही कामाची गरज आहे…’

(हेही वाचा Chandrayaan – 3 : चंद्रयान – 2 ने चंद्रयान -3 भेटल्याचे तात्काळ कळवले इस्रोला

थ्रेड्स अॅप एक मजकूर आधारित प्लॅटफॉर्म

थ्रेड्स हा मजकूर आधारित व्यासपीठ आहे. तुम्ही यावर 500 वर्णांपर्यंतच्या थ्रेड पोस्ट प्रकाशित करू शकता. लिंक्स, फोटो आणि व्हिडीओही शेअर करता येतात. व्हिडिओ 5 मिनिटांपर्यंतचे असू शकतात. इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी म्हणाले की, एलन मस्क यांच्या नेतृत्वाखाली ट्विटरची “अस्थिरता” आणि “अनप्रेडिक्टेबिलिटी” ने मेटाला X (तेव्हा ट्विटर) शी स्पर्धा करण्याची संधी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.