श्रीहरिकोटामधून १४ जुलैला सतीश धवन स्पेस सेंटरमधून चंद्रयान ३ (Chandrayaan 3)चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर ISRO ने आता सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चंद्रयान ३ हे २३ किंवा २४ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. चंद्रानंतर आता इस्त्रो येत्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ मिशन लाँच करु शकते.
आदित्य एल १ (Aditya L-1)
आदित्य एल १ ही सूर्याचा अभ्यास (ISRO Solar Mission Aditya L-1) करण्यासाठीची महत्त्वाची मोहीम आहे. सूर्याचा अभ्यास करण्याची ही भारताची पहिलीच अंतराळ मोहीम आहे. त्यासाठी भारत ‘आदित्य L1′ हे अंतराळयान अवकाशात पाठवणार आहे. या मिशनतर्गंत आदित्य L1 द्वारे विजिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ’ (VELC) उपकरण अंतराळात पाठवलं जाणार आहे. या मिशनसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (IIA) च्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CREST) कडून VELC तयार करण्यात आलं आहे. या सेंटरने आता हे VELC इस्रोकडे सुपूर्द केलं आहे.
सूर्यामध्ये लपलेली रहस्ये उलगडण्यासाठी नासाने अनेक अंतराळ मोहिमा सुरू केल्या आहेत. त्यापैकी SOHO आणि पार्कर सोलर प्रोब या प्रमुख मोहिमा आहेत. नासाच्या या मोहिमांनी सूर्याशी संबंधित अनेक नवीन तथ्ये समोर आणण्याचं काम हाती घेतले आहे. सूर्य हा ४.५ अब्ज वर्ष जुना तारा असून सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने ९ ग्रह गोलाकार मार्गावर बांधले गेले आहेत. पृथ्वीवरील जीवनासाठी सूर्यापासून येणारा प्रकाश खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. अवकाशातील हा गोळा चेंडूसारखा दिसणा-या सूर्यात इतकी अफाट ऊर्जा कुठून येते?, असा प्रश्न अनेकदा प्रत्येकाच्या मनात येतो. अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी इस्त्रोने हे मिशन हाती घेतलं आहे. त्याशिवाय भविष्यात याशिवाय अजून कुठले मिशन असणार आहेत ते पाहूयात.
(हेही वाचा Chandrayan- 3 चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करेल आणि अंतराळ मोहिमांचा एक नवा इतिहास घडवेल)
गगनयान मोहीम (Gaganyaan Mission)
इस्त्रोची गगनयान ही महत्त्वपूर्ण मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत मानवयुक्त अंतराळयान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या मोहिमेत २ मानवरहित आणि एक मानवयुक्त अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जाणार आहे.
मंगळयान 2 (Mangalyaan 2)
मंगलयान २ हे ऑर्बिटर मिशन २०२५ मध्ये अंतराळात पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे.
अॅस्ट्रोसॅट 2 (AstroSat 2)
इस्रोकडून अॅस्ट्रोसॅट – २ अंतराळात पाठवण्यासाठीही इस्त्रोकडून काम सुरु आहे.
लुप्लेक्स (LUPEX-Lunar Polar Exploration Mission)
लुप्लेक्स ही मोहीम भारत आणि जपानकडून संयुक्तपणे केली जाणार आहे. चंद्रावर असलेल्या जलस्रोतांचे प्रमाण आणि स्वरूप पाहण्यासाठी ही मोहीम आहे.
Join Our WhatsApp Community