जुलै महिन्यात सततच्या पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी भिंत कोसळल्याच्या घटना घडल्या. मात्र आता पाऊस नसतांनाही (Kurla Wall Collapsed) कुर्ल्यामध्ये भिंत कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या कुर्ला भागात सोमवारी (२१ ऑगस्ट) रात्री एक दुर्दैवी घटना घडली. कुर्ला पश्चिमेकडील सुभाष नगर येथील भारत टॉकीजच्या मागच्या बाजूला असलेल्या एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. ही संरक्षक भिंत लागूनच असलेल्या चाळीतल्या एका घरावर कोसळली. या दुर्घटनेत एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. भिंत कोसळल्यानंतर या तरुणीला जखमी अवस्थेत उपचारांसाठी जवळच्याच पालिका रुग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु, तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.
(हेही वाचा – Devendra Fadnavis : जपानमध्ये ‘जय भवानी-जय शिवाजी’चा गजर, फडणवीसांचे मराठी गीताने स्वागत)
Maharashtra | A compound wall of a house collapsed on the adjacent Chawl at 08:30 pm behind Bharat Talkies in Kurla (West). An 18-year-old girl was declared brought dead when she was taken to the hospital: BMC
— ANI (@ANI) August 21, 2023
साधारणपणे सात ते आठ फूट उंच संरक्षण भिंत (Kurla Wall Collapsed) बाजूच्याच एका घरावर कोसळली. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरातील एका १८ वर्षीय तरुणीचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर या घरातील इतर माणसं जखमी झाली आहेत.
तरुणीला कुर्ल्यातल्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान (Kurla Wall Collapsed) तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community