Olive Ridley Turtle : सॅटेलाईट टॅगिंग केलेले कासव रमले बंगालच्या उपसागरात

258
Olive Ridley Turtle : सॅटेलाईट टॅगिंग केलेले कासव रमले बंगालच्या उपसागरात

गुहागर येथील समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या बागेश्री नावाच्या मादी (Olive Ridley Turtle) ऑलिव्ह रीडले कासवाने बंगालच्या उपसागरातील तामिळनाडू नजिकचा समुद्र किनारा गाठला आहे. सोमवारी सॅटेलाइट प्रतिमेच्या माध्यमातून माहिती उघडकीस आली. गेल्या तीन आठवड्यांपासून बागेश्री बंगालच्या उपसागरात वास्तव्य करत आहे.

वनविभागाच्या कांदळ कक्षाने इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या मदतीने सागरी कासव निरीक्षण प्रकल्पा अंतर्गत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कासवांना (Olive Ridley Turtle) सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवले. देशाच्या पूर्व किनारपट्टीवर आढळणाऱ्या ऑलिव्ह रीडले कासवांचा समुद्रातील प्रवास जाणून घेणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. 22 फेब्रुवारी रोजी गुहागर येथील समुद्रकिनाऱ्यावर मादी ओलिव्ह रडले कासवाला शास्त्रज्ञांनी सॅटेलाईट टॅगिंग केले. या मादी ऑलिव्ह रिडले कासवाला ‘बागेश्री’ असे नाव देण्यात आले. दुसऱ्या मादी ऑलिव्ह रिडले कासवाला गुहा असं नाव शास्त्रज्ञाने दिले.

(हेही वाचा – Dhananjay Munde : राज्यात कांदा प्रश्न पेटला; कृषीमंत्री धनंजय मुंडे घेणार केंद्रीय कृषीमंत्री तोमरांसह पियूष गोयलांची भेट)

बागेश्री (Olive Ridley Turtle) भारतीय समुद्रकिनारा पार करत तीन आठवड्यांपूर्वी बंगालच्या उपसागरात पोहोचली. देशाच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर अंडी घातल्यानंतर ऑलिव्ह रिडले कासव बंगालच्या उपसागरात आढळत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती या अभ्यासाअंती समोर आली. सोमवारच्या ताज्या निरीक्षणानंतर बंगालच्या उपसागरात पावसाळ्याच्या ऋतुमानात ऑलिव्ह रिडले कासवांसाठी मुबलक खाद्य उपलब्ध असू शकतं, याची खात्री शास्त्रज्ञांना झाली,तर दुसरीकडे गुहा केरळच्या समुद्रकिनाऱ्याहून पुन्हा मागे वळत असल्याचे आढळून आले. गुहा सुरुवातीपासूनच अरबी समुद्रात दक्षिणेकडे फारच हळू प्रवास करत होती.आठवडाभरात गुहाने आता परतीचा प्रवास का सुरू केला आहे,असा शास्त्रज्ञांना प्रश्न पडला आहे.

New Project 2023 08 22T093408.635

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.