Dhananjay Munde : आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

152
Dhananjay Munde : आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या ‘स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’अंतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आला असून याअंतर्गत खड्डे खोदणे,ठिबक सिंचन यासारख्या कामांना १०० टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सोमवारी (२१ ऑगस्ट) केली.

फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही कृषीमंत्री मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी जाहीर केली.

(हेही वाचा – Olive Ridley Turtle : सॅटेलाईट टॅगिंग केलेले कासव रमले बंगालच्या उपसागरात)

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील कृषिमंत्री मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली.

राज्य सरकारने (Dhananjay Munde) ६ जुलै २०१८ ला भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून याअंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण,नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन १०० टक्के अनुदान देते.यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचनाऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार असल्याचेही कृषिमंत्री मुंडे यांनी नमूद केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.