खासगी पेमेंट ॲपची सुरक्षा धोक्यात?

डार्क वेबवर काही खासगी पेमेंट ॲपच्या ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचा धक्कादायक प्रक्रर उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा सुरक्षा यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 

123

कॅशबॅक, रिव्हॉर्ड्सचे आमिष दाखवून अधिकाधिक ग्राहकांना ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा अनेक मोबाईल पेमेंट ॲप कंपन्यांचा प्रयत्न असतो. सुरुवातीला या कंपन्या ग्राहकांना कॅशबॅक देतात, ग्राहकांना ॲपची सवय लागते, तो वारंवार त्या ॲपचा वापर करू लागतो, त्यानंतर मात्र कंपन्या कॅशबॅक हळूहळू बंद करतात. तरीही ग्राहक त्या कंपन्यांशी जोडलेला असतो. अशा लक्षावधी ग्राहकांचा आता डेटा विकण्याचाही प्रकार या कंपन्या करतात किंवा त्यांच्याकडील सुरक्षेची यंत्रणा कमकुवत असल्यानेही ग्राहकांचा डेटा चोरीला जात आहे. गुगल पे, मोबिक्विक, फोन पे आणि अमेझॉन असे खासगी पेमेंट ॲप आहेत. त्यामुळे आता खासगी पेमेंट ॲपच्या ऐवजी भीम ॲपसारख्या सरकारी ॲपची विश्वासार्हता वाढण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेनेही या सर्व खासगी पेमेंट ॲप कंपन्यांना १ एप्रिलपासून आरबीआयला अनुपालन प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे.

मोबिक्विक पेमेंट ॲपच्या ग्राहकांचा डेटा चोरीला?

  • मोबिक्विक ॲपकडील ग्राहकांचा डेटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
  • सुमारे ९ कोटी भारतीयांचा डेटा अशा प्रकारे लीक झाल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
  • काही ग्राहकांना त्यांचा डेटा हा डार्क वेबमध्ये दिसल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला
  • संबंधित ग्राहकांनी तत्काळ त्याचा स्क्रीन शॉट काढून ते सोशल मीडियात व्हायरल केल्यामुळे खळबळ उडाली
  • हा डेटा डार्क वेबवर १.५ बीट कॉइन किंवा ८६ हजार डॉलरच्या बदल्यात विकण्यात आल्याचे म्हटले आहे.
  • यात ग्राहकांचा फोन नंबर, आधार नंबर, पॅन नंबर, निवासी पत्ता इत्यादी डेटा लीक झाला आहे.
  • सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी फेब्रुवारीमध्ये प्रथमच हा प्रकार उघडकीस आणला. त्यांच्या मते ११ कोटी भारतीयांचा डेटा लीक झाला आहे. ६ टिबी इतका हा डेटा आहे.
  • आणखी एक सिक्युरिटी रिसर्चर अलिओट अल्डरसन यांनीही डेटा लीक झाल्याचे सोशल मीडियाद्वारे म्हटले आहे.

काही सेक्युरीटी रिसर्चरकडून डेटा लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याची आम्ही चौकशी केली असता असा कोणताही डेटा लीक झाला नाही. ज्या डार्क वेबवर डेटा लीक झाल्याचा दावा ग्राहकांनी केला आहे, त्यांनी अन्य ॲपवरही स्वतःचा डेटा नोंदवला असावा. मागच्या फेब्रुवारी महिन्यात सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया  यांनी प्रथमच हा प्रकार उघड केला, तेव्हा कंपनीने तात्काळ तज्ञांकडून चौकशी करून घेतली असता यासंबंधी पुरावा आढळून आला नाही. आमच्याकडील आर्थिक व्यवहारासंबंधी डेटा हा इनस्क्रिप्टड स्वरूपात आहे, त्यामुळे तो कुणाला चोरता येवू शकत नाही.
– बिपिन प्रीत सिंग, मॉबीक्विकचे मुख्य कायर्कारी अधिकारी.

रिझर्व्ह बँकेने मुसक्या आवळल्या!

खासगी पेमेंट ॲपच्या ग्राहकांचा डेटा लीक होत असल्याच्या प्रकाराची आरबीआयने गंभीरपणे दखल घेतली आहे. सर्व खासगी पेमेंट ॲप कंपन्यांना १ एप्रिलपासून वर्षाकाठी दोनदा आरबीआयकडे तपशीलवार ‘अनुपालन प्रमाणपत्र’ सादर करावे, असा आदेश दिला आहे. हे पत्र संबंधित सर्व कंपनांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापकीय संचालकांच्या स्वाक्षरीने असावे, असे या आदेशात म्हटले आहे. गुरगाव येथील मोबिक्विक या पेमेंट ॲपच्या ग्राहकांचा डेटा चोरीला गेला, त्यात प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. असाच प्रकारे याआधीही अन्य पेमेंट ॲप कंपन्या तसेच बिग बास्केट सारख्या इ-ग्रोसरी कंपन्यांकडील ग्राहकांचा डेटा चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा : बॉलिवूड अभिनेता एजाज खानला एनसीबीकडून अटक! आठ तास चौकशी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.