केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा (Onion News Update) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमितशाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी फडणवीस यांनी थेट जपानमधून संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय (Onion News Update) घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.
केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2023
(हेही वाचा – Dhananjay Munde : राज्यात कांदा प्रश्न पेटला; कृषीमंत्री धनंजय मुंडे घेणार केंद्रीय कृषीमंत्री तोमरांसह पियूष गोयलांची भेट)
टोमॅटो नंतर सध्या राज्यात कांद्याचा प्रश्न (Onion News Update) पेटला आहे. कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के शुल्क लावल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात ठिकठिकणी शेतकरी आंदोलन करत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे दिल्लीला रवाना झाले आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि कांद्यावरून (Onion News Update) सुरु असलेला वाद या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी धनंजय मुंडे हे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत.
मात्र या चर्चेपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधून हा निर्णय घेतला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community