Fraud : सावधान ! वजन काट्यात फसवणूक करणाऱ्यांवर होणार कारवाई, प्रशासनाकडून सर्वेक्षण मोहीम सुरू

ग्राहक संरक्षण विभागाच्या वैधमापन यंत्रणेकडून व्यापारी वर्गाला आवाहन

139
Fraud : सावधान ! वजन काट्यात फसवणूक करणाऱ्यांवर होणार कारवाई, प्रशासनाकडून सर्वेक्षण मोहीम सुरू
Fraud : सावधान ! वजन काट्यात फसवणूक करणाऱ्यांवर होणार कारवाई, प्रशासनाकडून सर्वेक्षण मोहीम सुरू

दुकानदार आणि व्यापारी यांच्याकडून वजन काट्यांच्या वापराबाबत ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 अन्वये, अप्रमाणित वजन काट्याची विक्री अथवा व्यवसायात वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या वैधमापन यंत्रणेकडून व्यापारी वर्गाचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक आर.डी. दराडे यांनी केले आहे.

वैध मापन शास्त्र यंत्रणेमार्फत वजन, माप आणि तोलन उपकरणे यांच्या अचूकतेबाबतची पडताळणी केलेली वजने वापरणे कायद्यान्वये बंधनकारक आहे. वजन आणि माप यांचा विक्री परवाना असलेल्या परवानाधारकानेच त्याची विक्री करणे आवश्यक आहे, असे असतानादेखील काही व्यापाऱ्यांकडून विविध देशांतून आयात केलेले चिनी बनावटीचे वजन काटे किंवा इतर राज्यांतून आणलेल्या इलेक्ट्रॉनिक्स काट्यांचा वापर करून अनधिकृतपणे वजन मापांची विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे आता संभाजीनगर जिल्ह्यात व्यापारी वर्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अप्रमाणित वजन काट्याची विक्री अथवा त्याचा व्यवहारामध्ये उपयोग करू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही उपनियंत्रकांकडून सांगण्यात आले आहे.

व्यापाऱ्यांना आवाहन
वजन काट्याच्या सर्वेक्षणाबाबत काही शंका असल्यास व्यावसायिकांनी 0240-2483818 या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपनियंत्रक आर.डी. दराडे यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.