Vaccination : राज्यातल्या सर्व गोवंशीय पशुधनाचं सात दिवसांत 100 टक्के लसीकरण, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

गाभण जनावरे आणि वासरे यांचेही लसीकरण

112
Vaccination : राज्यातल्या सर्व गोवंशीय पशुधनाचं सात दिवसांत 100 टक्के लसीकरण, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
Vaccination : राज्यातल्या सर्व गोवंशीय पशुधनाचं सात दिवसांत 100 टक्के लसीकरण, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

राज्यातील गोवंशीय पशुधनांवर लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लम्पी रोग नियंत्रणासाठी राज्यातल्या गोवंशीय पशुंधनाचं येत्या 7 दिवसांत 100 टक्के लसीकरण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली.

राज्यातील लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी त्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत सर्व गोवंशीय जनावराचे 100 टक्के लसीकरण सात दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या तसेच लसीकरण पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली.

(हेही वाचा  – Dhananjay Munde : 2410 प्रतिक्विंटल कांद्याचा दर ऐतिहासिक; धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले )

यासोबत साथ रोगाच्या संदर्भात गावपातळीवर स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचित केले. या बैठकीत विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी 1 जुलै 2023 पासून दुसऱ्या टप्प्यातील मोफत लसीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गाभण जनावरे आणि वासरे यांचेही लसीकरण करण्यात येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.