Lok Sabha Election : गजानन कीर्तिकरांच्या मतदारसंघावर रामदास कदमांचा डोळा?

140
Lok Sabha Election : गजानन कीर्तिकरांच्या मतदारसंघावर रामदास कदमांचा डोळा?

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाल्यामुळे (Lok Sabha Election) आगामी निवडणुकांवेळी तिन्ही घटक पक्षांत जागा वाटपाचा तिढा उद्भवण्याची चिन्हे असताना, शिवसेनेत मात्र आपसी कुरबुरींनी डोके वर काढले आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघात घुसखोरी सुरू केल्याने या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

रामदास कदम हे मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election) निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे वयोमान आणि प्रकृतीस्वास्थ्य पाहता त्यांच्याऐवजी आपल्याला संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मात्र, शिंदे यांनी त्यांच्या मागणीला गांभीर्याने घेतलेले नाही. तरीही त्यांनी कीर्तिकरांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत.

उत्तर पश्चिम लोकसभा (Lok Sabha Election) क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेणे, बैठकीला न येणाऱ्यांना पक्षातून काढून टाकेन असा दम भरणे, स्वमर्जीतील कार्यकर्त्यांची मुख्य पदांवर नेमणूक करण्यासाठी हट्ट धरणे, यावर रामदास कदम यांचा भर दिसून येत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही बाब कीर्तिकर यांच्या कानावर घालत तीव्र आक्षेप नोंदवला. मात्र, कीर्तिकर यांनी शिंदेंच्या दरबारात न्याय न मागता कुरघोडीच्या राजकारणाला कुरघोडीनेच उत्तर देण्याचे ठरवले आहे.

(हेही वाचा – Dhananjay Munde : 2410 प्रतिक्विंटल कांद्याचा दर ऐतिहासिक; धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले)

राजीनामा सत्र की दबावतंत्र?

– रामदास कदम (Lok Sabha Election) यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांदिवली, चारकोप आणि मालाड येथील ४० पदाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले होते. त्यानंतर आता अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, पूर्व दिंडोशी आणि गोरेगाव येथील ३०० नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे.
– मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना वर्षा निवासस्थानी बोलावून घेत त्यांची समजूत काढली. रामदास कदम यांना हटवा अन्यथा आम्ही राजीनामे देतो, असे या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर शिंदे यांनी तक्रारीची दखल घेत राजीनामे न देण्याचे आवाहन केले.
– दरम्यान, हे राजीनामा सत्र गजानन कीर्तिकर यांच्या दबावतंत्राचा एक भाग असून, रामदास कदम यांना वाटेतून दूर करण्यासाठीची त्यांची खेळी आहे, अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.

रायगडचे काय झाले?

रामदास कदम यांनी रायगड लोकसभा (Lok Sabha Election) लढवावी, अशी गळ स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातली होती. त्यावर कदम यांनी अनुकूलताही दर्शवली. मात्र, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली. त्यांना आपोआप या जागेवरील दावा सोडावा लागला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.