Uddhav Thackeray : ठाकरेंची ‘ती’ संकल्पना कागदावरूनही बाद!

245
Shiv Sena : बाळासाहेबांची इच्छा काय अन् उद्धव ठाकरेंनी केले काय?
Shiv Sena : बाळासाहेबांची इच्छा काय अन् उद्धव ठाकरेंनी केले काय?

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जानेवारी २०२१ मुंबईत स्ट्रीट फुड हब तयार करण्यात येणार असून यासाठी ६२ रस्त्यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा केली. म्हणजे या ६२ रस्त्यांवर खाऊ गल्ली करण्यात येणार होत्या. परंतु राष्ट्रीय फेरीवाला धोरणाला परस्पर बगल देत तत्कालिन मुखमंत्री यांची ही संकल्पना प्रत्यक्षात आकाराला येण्यापूर्वी कागदावरूनही गायब झाल्याचे दिसत आहे.

राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) ६२ रस्त्यांवर खाऊ गल्ल्या बनवण्याची संकल्पना जानेवारी २०२१ रोजी मांडली असली तरी अशाप्रकारच्या योजनांची माहितीच तेव्हा महापालिकेकडे उपलब्ध नव्हती. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केल्याशिवाय स्ट्रीट फुड हब अर्थात खाऊगल्लीची संकल्पना प्रत्यक्षात राबवता येणार नाही. त्यामुळे ‘जावू तिथे खाऊ’ ही शिवसेनेची संकल्पना असली तरी फेरीवाल्यांचे पुनर्वसन न करता काही ठराविक वर्गालाच डोळयासमोर ठेवून हा निर्णय सरकारने घेतल्याने याचाही शिव वडा होणार नाही ना असा सवाल त्यावेळी करण्यात आला होता.

(हेही वाचा – Lok Sabha Election : गजानन कीर्तिकरांच्या मतदारसंघावर रामदास कदमांचा डोळा?)

प्रत्यक्षात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या परवाना विभागालाच याची कल्पना नसून यापूर्वी स्ट्रीट ऑन व्हिल या वाहनांवर खाद्यपदार्थ विक्रीसाठी नियमावली बनवणाऱ्या आरोग्य विभागालाही याची कल्पना नाही. मात्र, खाऊगल्ल्यांच्या संकल्पनेची अंमलबजावणी फेरीवाला धोरणाच्या अमलबजाणीअभावी रखडली गेल्याचे बोलले जात आहे. भविष्यात ६२ रस्त्यांवर या खाऊगल्ल्या बनवल्यास त्यांना फेरीवाला धोरणातंर्गतच परवानगी द्यावी लागणार आहे. असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शिवसेनेने (Uddhav Thackeray) यापूर्वी १२५ शिव वडा हातगाडी योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु याचा समावेश धोरणात न करता शिवसेनेने परस्पर शिव वडा हातगाडया रस्त्यांवर आणल्या. मुंबईत सुमारे दोनशेहून अधिक हातगाड्या रस्त्यांवर आणून वडा पाव विक्रीचे स्टॉल्स टाकले गेले. परंतु शिव वडापावच्या या हातगाड्यांना कायदेशीर बळ नसल्याने पुढे अनधिकृत ठरवत महापालिकेने यावर कारवाई केली. त्यामुळे पुढे शिव वडाच्या हातगाड्या मुंबईतून हद्दपार झाल्या. त्यापुर्वी १९९५ला युती सरकारच्या काळात झुणका भाकर केंद्र उभारण्यात आली होती. पुढे ही झुणका भाकर केंद्र अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाई होवू लागल्याने अन्नदाता आहार केंद्र असे नामकरण करत या झुणका भाकर केंद्रांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेला सर्वांना परिचत असलेल्या खाऊ गल्ल्या स्ट्रिट फुड हबच्या गोंड्स नावाखाली काही वर्गातील लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न उबाठा शिवसेनेकडून सुरु होता. पण परंतु फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शिवसेना (Uddhav Thackeray) आग्रही नव्हती. त्यामुळेच मुंबईत उबाठा आणखी एक योजना आकाराला येण्यापूर्वीच बाद ठरल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.